'ब्युटी पार्लर ऐवजी लावलं सेक्स करायला', तरुणीसोबत घडला हादरवून टाकणारा प्रसंग - Mumbai Tak - minor girl forced into prostitution in ranchi on getting her work in beauty parlor - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

‘ब्युटी पार्लर ऐवजी लावलं सेक्स करायला’, तरुणीसोबत घडला हादरवून टाकणारा प्रसंग

Minor girl forced into prostitution in Ranchi : ब्युटी पार्लरमध्ये काम देण्याचे आमीष दाखवून एका तरूणीला वेश्या व्यवसायात (Sex Racket) ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरूणीला तिच्या कुटूंबियांच्या संमतीने धनबादमधून रांची (Ranchi) शहरात नेण्यात आले होते. या प्रकरणी आता तरूणीच्या कुटूंबियांनी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
minor girl forced into prostitution in ranchi on getting her work in beauty parlor

Minor girl forced into prostitution in Ranchi : ब्युटी पार्लरमध्ये काम देण्याचे आमीष दाखवून एका तरूणीला वेश्या व्यवसायात (Sex Racket) ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरूणीला तिच्या कुटूंबियांच्या संमतीने धनबादमधून रांची (Ranchi) शहरात नेण्यात आले होते. यानंतर तरूणीचा फोन हिसकावून तिला जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. साधारण पाच दिवस तरूणीसोबत हा घाणेरडा प्रकार सुरू होता. यानंतर तरूणीने कसा बसा आरोपींच्या तावडीत असताना मोबाईल फोन मिळवून संपूर्ण घटनाक्रम आपल्या भावाला सांगितला. त्यानंतर कुटूंबियांनी आरोपींना अनेक विनवण्या केल्यानंतर तरूणीची सुटका झाली होती. या प्रकरणी आता तरूणीच्या कुटूंबियांनी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे. (minor girl forced into prostitution in ranchi on getting her work in beauty parlor)

कुटूंबियांनीच आरोपीसोबत पाठवलं

कुटूंबियांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तरूणीचं कुटुंबिय खुप गरीब आहे. काही दिवसांपूर्वीच तीन व्यक्ती आमच्या घरी आल्या होत्या.यामध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता. या तीन व्यक्तींनी त्यांच्या मुलीला रांची शहरातील एका ब्युटी पार्लरमध्ये नोकरी देण्याचे आमीष दिले होते. या आमीषाला बळी पडत कुटूंबियांनी आरोपीसोबत आपल्या मुलीला पाठवले होते.

हे ही वाचा : Sakshi Murder Case : “डोक्याचे झाले होते चार तुकडे, पोटातील आतडेही…”

पाच दिवसांनी मुलीचा फोन

मुलीला घरातून पाठवल्याच्या पाच दिवसानंतर मुलाच्या मोबाईलवर फोन आला होता. या फोन कॉलवर ती खुप रडत होती. माझ्याकडून खुप वाईट काम करवून घेत जात असल्याची ती सांगत होती. मुलीच्या फोन कॉलनंतर कुटूंबियांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर कुटुंबियांनी आरोपींना फोन करून मुलीला घरी परत आणण्याची विनंती केली. सुरूवातीला त्यांनी याला नकार दिला. मात्र नंतर काही माणसे आमच्या घरी आली आणि त्यांनी मुलीला घरी सोडले. तसेच या घटनेची पोलिसांना माहिती दिल्यास तुमचं बरं वाईट करू अशी देखील धमकी देखील दिली होती.

तरूणीसोबत काय घडलं?

तरूणीने घरी परतल्यावर कुटुंबियांना सांगितले की, आरोपी मला रांची घेऊन गेला, तिकडे पोहोचवल्यावर त्यांनी माझा फोन हिसकावला. त्यानंतर मला एका रूममध्ये बंद करण्यात आले. रांचीमध्ये माझ्याकडून खुप घाणेरडे काम करवून घेतले जायचे. त्यानंतर मी माझा फोन शोधून काढत घरच्यांना संपूर्ण घटना सांगितली. या घटनेनंतर कुटुंबियांनी आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांनी एक महिला आणि तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. आता पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

हे ही वाचा :  गर्लफ्रेंडला OYOवर घेऊन गेला अन् तिच्या नवऱ्याला केला Video कॉल…

तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर हा आरोप खरा ठरल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तरूणीला मेडीकलसाठी पाठवण्यात आले आहे.या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु असल्याची माहिती जोगता ठाण्याचे ASI संतोष कुमार भगत यांनी सांगितले आहे.

‘नाना पाटेकरांची दहशत, दिग्दर्शकांना मारतात’, विवेक अग्निहोत्रींना कोणी भरवली धडकी? नशीब असावं तर असं! बकरी चरायला घेऊन जाणारा क्षणातच बनला कोट्यधीश भारताच्या इतिहासातील 10 सर्वात महान प्रभावी राजे कोणते? तुमच्या घरात फार काळ पैसा का टिकत नाही? भूकंप झाल्यानंतर नेमकी तीव्रता कशी मोजतात, रिश्टर स्केल म्हणजे काय? ‘या’ तारखांना जन्मलेले लोक बुद्धीने असतात हुशार, तुमची जन्म तारीख कोणती? सुंदर ते कोकण! ‘हे’ 10 नयनरम्य समुद्रकिनारे कुटुंबासोबत नक्की करा एक्सप्लोर नेमका काय असतो क्रॅश डाएट, ज्यामुळे गेला श्रीदेवीचा जीव? लाखो रूपयांच्या केशरची घरीच करा शेती, ‘ही’ सोपी पद्धत करा फॉलो! Mumbai मध्ये हँगआउट करण्यासाठी ही 10 ठिकाणं आहेत ‘बेस्ट’! Parineeti Chopra लग्नाच्या लुकवरून ट्रोल, कुणाला केलं कॉपी? टीना दाबीने आनंदाने सांगितली ही गोष्ट… IAS टीना दाबींच्या लेकाचा पहिला फोटो व्हायरल, काकांनी तर केले खूपच लाड! बिग बॉस फेम अभिनेत्रीला कोणी केली मारहाण? ‘तू माझे हृदय आहेस’, IAS रिया दाबीची रोमँटिक पोस्ट! श्रीदेवाची मृ्त्यूचं कारण बोनी कपूरने केलं उघड महात्मा गांधींनी बॅरिस्टर डिग्रीपर्यंतचं शिक्षण का घेतलं? Jio vs Airtel: 84 दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान! समजून घ्या… मुस्लिम क्रिकेटर-हिंदू अभिनेत्री, लग्नावेळी मिळाल्या होत्या ठार मारण्याच्या धमक्या! सुवर्ण मंदिरातील ‘त्या’ व्हिडीओमुळे राहुल गांधी पुन्हा चर्चेत…