Kolhapur Suicide : कोल्हापूरच्या पाटोळेवाडी परिसरातील रहिवासी असलेल्या श्रीकांत सूर्यकांत काटकर (वय 33) नामक इंजिनिअर व्यक्तीने जीवन संपवलं. सिद्धि हेरिटेज हाउसिंग सोसायटीच्या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून त्याने उडी मारून टोकाचं पाऊल उचललं. ही घटना 20 मे 2026 रोजी दुपारच्या दरम्यान घडली होती. उच्च शिक्षित तरूणाने आत्महत्या का केली असावी? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बापाने लेकीचे तुकडे केले, डोकं तलावात फेकून मृतदेह सुटकेसमध्ये...
श्रीकांत काटकर तणावात
लामबोरे हाउसिंग सोसायटीत राहणाऱ्या सूर्यकांत काटकर हे विन विभागातून सेवानिवृत्त होते. ते आपल्या सासूसोबत आणि मुलासोबत राहत होते. चार ते पाच वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. आईच्या निधनानंतर श्रीकांत काटकर तणावात राहत होते. ते इंजिनिअर आणि सरकारी ठेकेदार म्हणून काम करत होते. श्रीकांतच्या दोन शिक्षित विवाहित बहिणी देखील आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे दोन्ही बहिणी मुंबईहून कोल्हापूला गेल्या होत्या.
पाचव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं जीवन
त्यांना सोडण्यासाठी सकाळी सूर्यकांत काटकर गेले होते. तणावत असलेल्या श्रीकांत काटकरांनी बुधवारी दुपारी घरातून बाहेर निघाले होते. दरम्यान 200 मीटर अंतरावर असलेल्या सिद्धि हेरिटेज हाउसिंग सोसायटीच पोहोचले आणि पाचव्या मजल्यावरून उडी मारली. खाली पडल्यानंतर, नागरिकांना मोठा आवाज ऐकू आला होता. हे चित्र पाहून नागरिकांनी शाहूपुरी पोलीस ठाणे गाठत या घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासादरम्यान त्यांना मोबाईल आढळून आला होता. मोबाईलच्या आधारे जीवन संपवणारी व्यक्ती श्रीकांत काटक असल्याचे समजले आणि त्यांनी सूर्यकांत काटकर यांना माहिती दिली.
हे ही वाचा : बायकोनं दुसरं लग्न केलं, नवऱ्याने पेट्रोल ओतून घर पेटवलं; स्वत:ही भाजला
दरम्यान, श्रीकांत काटकर यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आले नाही. सध्या नोकरीच्या मुद्द्यावरून अनेक तरूण टोकाचं पाऊल उचलत आहेत. यामुळे आता मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT











