Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. येथे सहा जणांनी मिळून एका व्यक्तीची त्याच्याच मुलांसमोर निर्घृणपणे हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. 3 वर्षे आणि 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलांसमोर त्यांच्या वडिलांना आधी बेदम मारहाण करण्यात आली, नंतर पीडित व्यक्तीची बोटं छाटली आणि शेवटी चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. व्यवसायातील स्पर्धा हेच घटनेमागचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणासंबंधी पोलिसांनी तातडीने कारवाई करत नऊ तासांच्या आत तिन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
पीडित तरुण मुलांसोबत घराबाहेर पडला अन्...
बुधवारी (1 ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन जवळील सिल्क मिल कॉलनीमध्ये ही घटना घडली. येथील रहिवासी असलेली सैय्यद इमरान शफीक नावाची व्यक्ती आपल्या दोन मुलांसोबत ऑटोमधून बाहेर जात होते. अचानक, एका कारने त्यांच्या ऑटोला रोखलं. त्यावेळी, पाच ते सहा जण कारमधून बाहेर आले आणि त्यांनी शफीफ आणि त्याच्या मुलांना बळजबरीने ओढत ऑटोमधून बाहेर काढलं.
बोटं छाटली आणि मानेवर वार
आरोपींनी शफीकवर धारदार शस्त्रांनी वार करण्यास सुरूवात केली. निष्पाप मुलांसमोरच ही सर्व घटना घडत होती. त्यावेळी, स्वत:ला वाचवण्यासाठी शफीकने आरोपींच्या हातातील हत्यार हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर, आरोपींनी पीडित तरुणाची बोटं छाटली आणि चाकूने उजव्या हाताच्या मनगटावर तसेच मानेवर कित्येक वार केले. शरीरावर गंभीर जखमा झाल्यानंतर, पीडित तरुणाला एका फूट ओव्हरब्रिजखाली सोडून दिलं आणि त्यावेळी शफीकचा मृत्यू झाला.
हे ही वाचा: आरोपीच्या लग्नासाठी जामीन मंजूर? केसबाबात मुंबई हायकोर्टाचा 'तो' धक्कादायक निर्णय... नेमकं प्रकरण काय?
व्यवसायातील शत्रुत्व
गॅस व्यवसायाशी संबंधित शत्रुत्व हेच या हत्येमागचं कारण असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. खरंतर, शकीफ आणि मुख्य आरोपीमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू होते. पोलिसांनी तातडीने या गुन्ह्याचा तपास सुरू केला आणि घटनेच्या नऊ तासाच्य आतच तीन आरोपींना अटक करण्यात आली.
हे ही वाचा: आजीचं 35 वर्षीय तरुणावरच जडलं प्रेम! लपुनछपून दोघेही भेटायचे अन् एके दिवशी तर... प्रकरण थेट पोलिसात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणातील मुख्य आरोपी गुंड असून त्याच्याविरोधात यापूर्वी बरेच गुन्हे दाखल आहेत. याव्यतिरिकत्, इतर आरोपींचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
