इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मुसळधार पावसादरम्यान एक हृदयद्रावक अपघात घडला. एमजी रोड परिसरात भरधाव कारवर अचानक चिंचेचं झाड कोसळलं. या कारमध्ये चार जण प्रवास करत होते. झाड कोसळल्याने कारमधील सर्वजण आत अडकले. या दुर्घटनेत 72 वर्षीय राधा देवी यांचा मृत्यू झाला, तर कारच्या चालकासह तीन जण जखमी झाले. राधा देवी या एनव्हीडीएमध्ये कार्यरत डिप्टी कलेक्टर पूर्णिमा सिंघी यांच्या आई होत्या.
ADVERTISEMENT
डोळ्यांवर उपचार करून घरी परतत होत्या
मिळालेल्या माहितीनुसार, राधा देवी डोळ्यांवर उपचार करून इतरांसोबत कारमधून घरी परतत होत्या. त्याचवेळी इंदूरमध्ये जोरदार पाऊस सुरू होता. एमजी रोड परिसरातून कार जात असताना अचानक चिंचेचं झाड कारवर कोसळलं. या दुर्घटनेनंतर कार पूर्णपणे झाडाखाली दबली आणि त्यातील प्रवासी आत अडकले.
कारमध्ये चार जण, तिघे जखमी
या अपघातात कारमध्ये असलेल्या चारही जणांना अडचणींचा सामना करावा लागला. झाड कोसळल्यानंतर कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आलं. या दुर्घटनेत राधा देवी यांचा मृत्यू झाला, तर चालकासह अन्य तीन जण जखमी झाले.
अधिकारी आणि महापालिका पथक घटनास्थळी
दुर्घटनेचा माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहोचले. महापालिकेच्या बचाव पथकाच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं.
उपजिल्हाधिकारीच्या आईच्या मृत्यूने हळहळ
राधा देवी या एनव्हीडीएमध्ये कार्यरत उपजिल्हाधिकारी पूर्णिमा सिंघी यांच्या आई होत्या. डोळ्यांवर उपचार करून परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ADVERTISEMENT












