केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश, 7 जणांचा मृत्यू, मृतांपैकी 3 जण महाराष्ट्रातील यवतमाळचे

NDRF आणि स्थानिक पोलिसांच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. उत्तराखंडचे अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. वी. मुरुगेशन यांनीही पोलिस पथकासह घटनास्थळी भेट दिली आहे. 

File Photo

File Photo

मुंबई तक

15 Jun 2025 (अपडेटेड: 15 Jun 2025, 10:46 AM)

follow google news

Kedarnath Helicopter Crash : उत्तराखंडमधील केदारनाथ धामजवळ आज सकाळी एक हेलिकॉप्टर दुर्घटना झाली. ही दुर्घटना गौरीकुंड परिसरातील त्रिजुगीनारायण नारायणजवळ घडली. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे होते आणि ते केदारनाथ धामहून फाटाकडे जात होते. या घटनेत हेलिकॉप्टरमधील सर्व 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> गोदामाला आग, मालक आणि कामगार अडकले, होरपळून दोघांचाही अंत, प्रत्यक्षदर्शी म्हणाले...

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) आणि स्थानिक पोलिसांच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. उत्तराखंडचे अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. वी. मुरुगेशन यांनीही पोलिस पथकासह घटनास्थळी भेट दिली आहे.  मृत्यू झालेल्यांपैकी तीन जण हे यवतमाळच्या एकाच कुटुंबातले आहेत अशी माहिती आहे. 

हे ही वाचा >> आता 'यासाठी' हॉटेल भाग्यश्री बंद ठेवण्याचा घेतला मालकाने निर्णय!

दरम्यान, अहमदाबादमध्ये तीन दिवसांपूर्वीच मोठा अपघात झाला. अहमदाबादमध्ये 12 जून 2025 रोजी एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 (बोइंग 787-8 ड्रीमलाइनर) चा भीषण अपघात झाला. हे विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जात असताना, उड्डाणानंतर काही सेकंदातच मेघनीनगर परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात कोसळलं. विमानात 230 प्रवासी, 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर्स असे एकूण 242 जण होते. या अपघातात 274 हून अधिक जणांचा मृत्यू झाला, तर फक्त एका ब्रिटिश-भारतीय व्यक्तीला वाचवण्यात यश आले. विमान जिथे कोसळलं तिथल्या लोकांचाही मृतांमध्ये समावेश आहे. 


    follow whatsapp