आता 'यासाठी' हॉटेल भाग्यश्री बंद ठेवण्याचा घेतला मालकाने निर्णय!
Hotel Bhagyashree: अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली म्हणून आज (14 जून) हॉटेल भाग्यश्री बंद करण्याचा निर्णय हॉटेल मालकाने घेतला आहे.
ADVERTISEMENT

गणेश जाधव, धाराशिव: अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेबाबत देशासह संपूर्ण जगातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच आता धाराशिव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हॉटेल भाग्यश्री यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण समोर ठेवले आहे. या दुर्घटनेतील प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज (14 जून) पूर्ण दिवसभरासाठी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय मालकांनी घेतला आहे.
नेमकं काय म्हणाले हॉटेलच्या मालक?
"शिकलेलो नसलो तरी माणुसकी आहे. जे प्रवासी आपल्या आप्तांना पाच-सहा वर्षांनी भेटण्यासाठी निघाले होते, त्यांचा मृत्यू ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे. म्हणूनच आम्ही आज आमचं हॉटेल बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत."
हे ही वाचा>> "खचून जाऊ नका...", हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड, हॉटेल तिरंगाच्या मालकाचा सपोर्ट, म्हणाले...
ही घटना समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत असून, नागरिकांनी हॉटेलच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. "व्यवसायापेक्षा माणुसकी मोठी," अशा स्वरुपाच्या कमेंट सोशल मीडियावर यावेळी पाहायला मिळत आहे.
"हॉटेल भाग्यश्री बंद...", म्हणून टोळक्याने केलेली तोडफोड










