"खचून जाऊ नका...", हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड, हॉटेल तिरंगाच्या मालकाचा सपोर्ट, म्हणाले...
हॉटेल तिरंगाचे मालक लक्ष्मण भोसले यांनी रीलच्या माध्यमातून हॉटेल भाग्यश्रीच्या तोडफोडीवर आपली प्रतिक्रिया दिली. "व्यवसाय उभं करणं खूप मोठी गोष्टय, त्यामुळे असं एखाद्यासोबत करू नका, असं आवाहन त्यांनी लोकांना केलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हॉटेल भाग्यश्रीची टोळक्याकडून तोडफोड

हॉटेल मालक नागेश मडकेंनी दिली माहिती

हॉटेल तिरंगाच्या मालकांनी दिली धीर, म्हणाले...
Hotel Bhagyashree News : हॉटेल भाग्यश्री... क्लॉलिटी विचारा अन् क्वाँटिटी विचारा... हॉटेल तिरंगा... नाद करती काय.. यावंच लागतंय! सोशल मिडिया ओपन केलं, की रील तुम्हाला दिसलेच समजा... गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही हॉटेल मालकांनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातलाय. रीलच्या माध्यमातून व्यवसायाची स्पर्धा दाखवणारे दोघांचेही रील चर्चेत असतात. अशातच हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड झाल्याची घटना घडली. या घटनेत हॉटेल भाग्यश्रीचे बॅनर आणि बोर्ड फाडले गेले असून, सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती हॉटेल मालक नागेश मडके यांनी दिली. त्यानंतर आता सोशल मीडियावर हॉटेल भाग्यश्रीसोबत तुफान स्पर्धा करणारे, हॉटेल तिरंगाच्या मालकांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा >>"हॉटेल भाग्यश्री आज बंद...", म्हणून टोळक्याकडून तोडफोड, 70 हजारांचं नुकासन, मालक म्हणाले आता...
हॉटेल तिरंगाचे मालक काय म्हणाले?
हॉटेल तिरंगाचे मालक लक्ष्मण भोसले यांनी रीलच्या माध्यमातून हॉटेल भाग्यश्रीच्या तोडफोडीवर आपली प्रतिक्रिया दिली. "व्यवसाय उभं करणं खूप मोठी गोष्टय, त्यामुळे असं एखाद्यासोबत करू नका, असं आवाहन त्यांनी लोकांना केलंय. तसंच भाग्यश्रीच्या मालकांनी खचून जावू नये असं म्हणत भोसले यांनी नागेश मडकेंना धीरही दिलाय. तसंच एक पाऊल मराठी माणसाकडे अशी खास टॅग लाईनही त्यांनी वापरलीये.
लक्ष्मण भोसले काय म्हणाले? लिंकमध्ये व्हिडीओ...
https://www.facebook.com/share/r/1G8FsecpMA/
हे ही वाचा >>बॉयफ्रेंडनं महिलेला OYO हॉटेलमध्ये नेऊन चाकूनं केले 17 वार, कारण ऐकूण हादरून जाल
दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मडके यांनी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितलं, “हॉटेल भाग्यश्री आज 10 जून रोजी उघडणार होतं, पण काल रात्री अचानक दगडफेक झाली. बॅनर व बोर्ड फाडले गेले. त्यामुळे हॉटेल काही काळासाठी बंद ठेवावं लागलं. पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पुढील कारवाई सुरू आहे.” मडके यांनी या घटनेमुळे आपल्या जिवीताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
हे ही वाचा >> प्रेयसीने स्वत:ला संपवलं, दारूच्या नशेत प्रियकरानेही चितेत... नागपूरमधील धक्कादायक घटना
फक्त 250 रुपयांत भरगच्च मटण थाळी, अनलिमिटेड रस्सा आणि झणझणीत चव यामुळे भाग्यश्री हॉटेलने अल्पावधीतच ग्राहकांच्या मनात स्थान मिळवलं होतं. दिवसाला 10 ते 12 बोकड कापले जाण्याइतकी मागणी आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ यामुळे हॉटेलचे नाव घराघरांत पोहोचलंय. त्यानंतर आता ही झालेली तोडफोड अनेकांना दुखावणारी आहे, तर अनेकांसाठी हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालाय.