Extra Marital Affair Viral News : फिरोजपूरच्या जीरा येथील सेखवा गावात पत्नीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पतीने स्वत:चं जीवन संपवलं. या महिलेच्या पतीनं पंख्याला पत्नीची ओढणी बांधून गळफास घेतला. जसविंदर सिंग असं मृत व्यक्तीचं नाव आहे. जीरा पोलिसांनी मृत जसविंदर सिंगच्या पत्नीच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
महिलेचं सेखवा गावातील तरुणासोबत अनैतिक संबंध
मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे वडिल दर्शन सिंग यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय, त्यांचा मुलगा जसविंदर सिंगचं लग्न 15 वर्षांपूर्वी कर्मजीत सोबत झालं होतं. कर्मजीतचे मागील एकवर्षांपासून सेखवा गावातील तरुण वीरसोबत अनैतिक संबंध होते. यामुळे त्याचा मुलगा जसविंदर आणि सून कर्मजीत यांच्यात अनेक वादविवाद होत होते.
हे ही वाचा >> Rain Update: पुढील 3 तास धोक्याचे, IMD कडून ठाणे जिल्ह्यासाठी Red अलर्ट जारी.. अतिमुसळधार पाऊस
याच गोष्टीला संतापून त्याच्या मुलाने बेडरूममध्ये पंख्याला ओढणी लावून गळफास घेतला.या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन कारवाई सुरु केली. जीरा पोलिसांनी दर्शन सिंगच्या जबाबानंतर आरोपी वीरू विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेत आहेत.
त्या ठिकाणीही घडली धक्कादायक घटना
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील मालगोंडा गावातही एक खळबळजनक घटना घडली. येथील एक महिलेनं तिच्या पतीचा खून करून मृतदेह घराजवळील नाल्यात पुरला. या धक्कादायक घटनेमुळं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यशवंत ठाकरे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. दोन महिन्यांनंतर पोलिसांनी या प्रकरणाचं गूढ उकललं. त्यानंतर पत्नी प्रभाने पतीचा खून केल्याचं कबूल केलं.
हे ही वाचा >> चालत्या बाइकवर कपलचे सुरू होते अश्लील चाळे, पण पुढच्या क्षणीच मिळाला मोठा धडा!
ADVERTISEMENT
