चालत्या बाइकवर कपलचे सुरू होते अश्लील चाळे, पण पुढच्या क्षणीच मिळाला मोठा धडा!

Couple Romantic Video Viral :  नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेसवेवर एका कपलने खुलेआम रोमान्स केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत पाहू शकता की, एक कपल बाईकवर बसून रोमॅन्टिक स्टंट करतात.

Couple Romantic Video Viral

Couple Romantic Video Viral

मुंबई तक

16 Jun 2025 (अपडेटेड: 16 Jun 2025, 07:58 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भर रस्त्यात रोमान्स करणाऱ्या कपलवर पोलिसांनी केली कारवाई

point

सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

point

त्या हायवेवर नेमकं घडलं तरी काय?

Couple Romantic Video Viral :  नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेसवेवर एका कपलने खुलेआम रोमान्स केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत पाहू शकता की, एक कपल बाईकवर बसून रोमॅन्टिक स्टंट करतात. त्यामुळे हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात आला. बाईकवर या कपलने रोमान्स करून वाहतूक नियमांचं पालनही केलं नाही..हा धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच वाहतूक पोलिसांनी या दोघांवरही कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी चालकावर कारवाई करत दंडही ठोठावला.

हे वाचलं का?

हजारो रुपयांचा दंड आणि...

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, तरुण वेगाने दुचाकी चालवत आहे. त्याने एका तरुणीला दुचाकी चालवत असतानाच मिठीत घेतलं आणि धोकादाय स्टंटबाजी केली. हा भयंकर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी चालकावर कारवाई केली. पोलिसांनी 53 हजार 500 रुपयांचं चलन कापलं. आता नोएडा पोलिसांकडून दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा शोध घेतला जात आहे.

हे ही वाचा >> Mumbai Rain: मागील 2 तासांपासून मुंबईत सुरूय धडकी भरवणारा तुफान पाऊस, पाहा कुठे-कुठे पाणी भरलं?

वाहतूक पोलिसांनी घेतली अॅक्शन

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नोएडा ट्रॅफिक पोलिसांनी या घटनेची तातडीनं दखल घेतली. व्हिडीओत पाहू शकता की, तरुण दुकाची वेगाने चालवत असताना एका तरुणीला मिठीत घेतो. भर रस्त्यात रोमॅन्टिक स्टंटबाजी करून इतर प्रवाशांचा जीव धोक्यात टाकण्याचा प्रयत्न त्याने केला. हा व्हिडीओ इतर प्रवाशांनी कॅमेरात कैद केला आणि तो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला. 

हे ही वाचा >> ऑनलाईन रम्मीचा नाद लय बेकार, विवाहित तरुणाने दोन मुलांसह पत्नीला पाजलं विष अन्...

सोशल मीडियावर अशाप्रकारे अनेक व्हिडीओ व्हायरल

काही कपल वाहतूक नियमांचं पालन न करता, कारमध्ये किंवा बाईकवर भर रस्त्यात रोमान्स आणि स्टंटबाजी करतात. अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून अशा भामट्यांविरोधात कठोर कारवाई केली जाते. अशीच एक धक्कादायक घटना नोएडा येथे घडली. त्यानंतर पोलिसांनी दुचाकी चालकावर तातडीनं दंडात्मक कारवाई केली. 

    follow whatsapp