पतीने दिली समोशाची ऑर्डर, पत्नी वॉशरूमधूनच झाली गायब.. लग्नाच्या 10 व्या दिवशीच काय घडलं?

Crime News : उत्तर प्रदेश चंदौली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. नवविवाहित महिला आपल्या पत्नीसोबत लग्नानंतर दहा दिवसानंतर खरेदी करण्याच्या बहाण्याने बाजारात गेली आणि गायब झाली. मुलाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

crime news newlywed wife disappears from market after leaving husband

crime news newlywed wife disappears from market after leaving husband

मुंबई तक

16 Jun 2025 (अपडेटेड: 16 Jun 2025, 04:29 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवविवाहित महिला बाजारातून झाली गायब

point

मुलाच्या कुटुंबियांना धक्का

Crime News : उत्तर प्रदेश चंदौली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. नवविवाहित महिला आपल्या पत्नीसोबत लग्नानंतर दहा दिवसानंतर खरेदी करण्याच्या बहाण्याने बाजारात गेली आणि गायब झाली. मुलाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पोलिस तपास करत आहेत. 

हे वाचलं का?

हेही वाचा : मुंबईची खबर: “शाळा बॉम्बने उडवून टाकू…” अवघ्या मुंबईत खळबळ उडवून देणारी बातमी

हे प्रकरण चंदौली जिल्ह्यातील मुघलसराय कोतवाली भागातील आहे. नवविवाहित तरुण शमशेर चौहान याचे 4 जून रोजी खुशी नावाच्या तरुणीशी विवाह केला. लग्नात उत्सवाचे वातावरण असून सर्वकाही सुरळीत होते. मात्र लग्नाच्या दहा दिवसानंतर पत्नी खुशी गायब झाल्याची माहिती समोर आली. 

पत्नी बाजारातून झाली गायब

पत्नी खुशीने आपल्या पतीकडे डोकं दुखत असल्याची तक्रार केली होती. अशावेळी शमशेरने तिला डॉक्टरांकडे नेलं. त्यावेळी खुशीने खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशावेळी ते दोघेही बाजारात गेले आणि काही वेळ फिरून झाल्यानंतर काली माता मंदिराजवळ असणाऱ्या एका रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबले होते. 

शमशेरनं दिलेल्या माहितीनुसार, समोस्यांची ऑर्डर दिली होती. त्यावेळी शमशेर तोंड धुण्यासाठी गेला असता, महिला तिथून गायब झाली ती पुन्हा आलीच नाही. अशावेळी शमशेरनं तिचा शोध घेतला. हॉटेलच्या मजल्यावर जाऊन शमशेरनं पाहणी केली, पण ती सापडलीच नाही. त्यानंतर शमशेर घरी परतला आणि घडलेल्या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांना सांगितली. 

हेही वाचा : नोकरीसाठी तरुणी मुंबईला आली आणि झाला अपेक्षाभंग, आत्महत्या केली अन् सुसाईड नोटमध्ये...

ही महिती खुशीच्या घरी सांगितली असता, खुशी तिच्या माहेरी पोहोचली नव्हती. अशावेळी पोलिसांनी खूशी फरार असल्याची शक्यता व्यक्त केली. पोलिसांनी महिलेचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. मात्र अद्यापही महिलेचा तपास झालेला नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.

    follow whatsapp