मुंबईची खबर: “शाळा बॉम्बने उडवून टाकू…” अवघ्या मुंबईत खळबळ उडवून देणारी बातमी
मुंबईतील कांदिवली शहरात इंटरनॅशनल स्कूलला मेल पाठवून त्यात बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईत शाळेला बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी

इंटरनॅशनल स्कूलबाबतीत नेमकं काय घडलं?

कशी आणि कोणी दिली धमकी?
Mumbai News: कांदिवली पूर्व भागातून एक खळबळजनक बातमी समोर आल्याने शाळेतील आणि शिक्षकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या शहरातील रायन इंटरनॅशनल स्कूलला मेल पाठवून त्यात बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेलद्वारे धमकी देणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल
हा मेल पाठवणारा व्यक्ती आता आपली ओळख आणि ठिकाण लपवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली आहे. ईमेलमध्ये शाळेत बॉम्बस्फोट होण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र या प्रकरणासंबंधी तात्काळ सूचना आणि सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या. समतानगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेल पाठवणाऱ्याची ओळख आणि स्थान शोधण्यासाठी सायबर सेल देखील सक्रिय करण्यात आला आहे.
सोशल मीडियाचा वापर करुन लोकांमध्ये भीती तसेच दहशत निर्माण करण्याच्या कलमांखाली त्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आता त्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटवण्याच्या आणि त्याला पकडण्याच्या दिशेने ठोस पावलं उचलली जात आहेत.
मेलद्वारे धमकी देण्याच्या प्रकरणात वाढ
नुकतंच बीकेसीमधील अमेरिकन वाणिज्य दूतावासालाही बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. आता शाळांना मिळालेल्या या नवीन ईमेलमुळे पालक आणि प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. या प्रकरणासंबंधी बऱ्याच पालकांनी त्यांच्या मुलांच्या सुरक्षेबाबत शाळांशी संपर्क साधला आणि मुलांच्या सुरक्षिततेमध्ये कोणताही हलगर्जीपणा केला जाणार नाही, याची खात्री मागितली.