I love mohammad : अहिल्यानगर जिल्ह्यात हिंदू संघटनेच्या कार्यक्रमामध्ये आय लव्ह मोहम्मद असा आशय रस्त्यावर रांगोळी काढून लिहिला होता, तसेच असंख्य मुस्लिम बांधव आता एकत्र रस्त्यावर उतरली आहेत. ही घटना आहिल्यानगरातील कोठला बसस्थानकासमोरील रस्त्यावरील आहे. याच ठिकाणी मुस्लिम जमावांनी रास्ता रोको करत पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. ही घटना 29 सप्टेंबर रोजी सकाळी घडल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'आजपासून ही भाची..', भाग्यश्री हॉटेलवाला बाप गमावलेल्या लेकीचा पालक बनला; आर्थिक मदत करण्यासाठी थेट घरी पोहोचला
मुस्लिम जमाव पोलिसांच्या दिशेनं...
आंदोलन करणाऱ्या मुस्लिमांचा जमाव गट हा शहराच्या दिशेने जात होता. तेव्हा पोलीस अगदी शांततेनं आपलं काम करत होते. या जमावाबरोबर वाद झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. यामुळे आहिल्यानगरातील कोठला परिसरात ताणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं समोर आलं.
'आय लव्ह मोहम्मद' आशयाची रांगोळी
दरम्यान, अहिल्यानगरात शहरत सकाळी हिंदू संघटनेनं रॅली काढली होती. त्या रॅलीत बारा तोटी कारंजा रस्त्यावर आय लव्ह मोहम्मद असा आशय रांगोळी काढलेल्या स्वरुपात रस्त्यावर लिहिला होता. तेव्हा याचभोवती फुलांच्या पाकळ्या देखील होत्या. तेव्हाच काही मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरले.
संबंधित प्रकरणात पोलिसांकडून कारवाईची मागणी व्हावी यासाठी मु्स्लिम तरुणांनी ठाण्यासमोरील रस्त्यावर बसत रस्ता रोको केला. पोलिसांनी कारवाई करण्यास सुरु असल्याच्या आश्वासनानंतरही जमाव रस्त्यावरून उठलाच नाही. जमावाला अनेकदा समजावून सांगितले तरीही त्यांनी काहीही एक ऐकलं नाही. अखेर पोलिसांनी जमावावर हटवण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा : जमिनीवरून वाद, पोटच्या लेकानं आई-बापाला लाठीकाठीने हल्ला करत संपवलं, बुलढाण्यात चीड आणणारा प्रकार
एसपी सोमनाथ बर्गे काय म्हणाले?
संबंधित प्रकरणात आहिल्यानगरचे एसपी सोमनाथ बर्गे यांनी प्रतिक्रिया दिली की, सकाळी कोतवाली पोलीस ठाणे परिसरात रांगोळी काढण्यात आली होती. त्यावरून आता मुस्लिम समाजातील लोकांना त्यावरून आपत्ती दाखवली. तसेच ज्यांनी ही रांगोळी काढली होती, त्यालाही अटक करण्यात आली आहे. त्याठिकाणी मुस्लिम समाजातील लोक एकत्र आले आणि त्यांनी रस्ता रोको केला. पोलिसांनी अनेकदा त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं, पण ते शांत राहिले नाहीत. अखेर पोलिसांनी बळाचा वापर केला आणि जमाव पांगवला, असे ते म्हणाले.
ADVERTISEMENT
