ही खरी वाघीण.. आईवर हल्ला करणाऱ्या पिसाळलेल्या कोल्ह्याचा लेकीने आवळला गळा!

मुंबई तक

29 Mar 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 11:44 PM)

Sangli Girl: पिसाळलेल्या कोल्ह्याने आईवर जीवघेणा हल्ला केल्याचं पाहताच तरूण मुलीने चक्क कोल्ह्याचाच गळा आवळला. ज्यामुळे कोल्ह्याच्या हल्ल्यातून आईची सुखरूप सुटका झाली. ही घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे.

Sangli Girl save mother from fox

Sangli Girl save mother from fox

follow google news

प्रबोधिनी चिखलीकर, सांगली

हे वाचलं का?

सांगली: सांगली (Sangli) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कोगनोळी येथील आटपाडकर वस्ती येथील महिलेवर पिसाळलेल्या कोल्ह्याने (Fox) हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सुरेखा लिंगाप्पा चवरे ही महिला कोल्ह्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. पिसाळलेल्या कोल्ह्याने सुरेखा यांच्या हातांच्या बोटांचा चावा घेऊन त्यांना जखमी केलं. मात्र, याचवेळी त्यांची मुलगी कविता हिने वाघिणीसारखं धाडस करत आपल्या दोन्ही हाताने कोल्ह्याचा गळाच आवळला. (in sangli a mother was attacked by a maddened fox a single girl strangled the fox and the mother escaped safely)

मुलीने पिसाळलेल्या कोल्ह्याच्या गळा आवळल्याने सुरेखा यांना आपली बोटं काढून घेता आली आणि मोठी हानी टळली.

कोल्ह्याच्या हल्ल्यातून सुटका होताच सुरेखा यांनी बाजूला पडलेले दगड आणि काठीने कोल्ह्यावर हल्ला चढवला. त्याचवेळी मुलीने कोल्ह्याचा आवळलेला गळा सोडून दिला. आईने उगारलेली काठी व लेकीने केलेली दगडफेक यामुळे कोल्ह्याने तात्काळ तिथून पळ काढला.

अधिक वाचा- Namibian cheetah Sasha: कुनो नेशनल पार्कातील साशा चित्त्याचा मृत्यू कशामुळे झाला?

या भयानक हल्ल्यावेळी तिथे असलेल्या कविताने थेट पिसाळलेल्या कोल्ह्याचा गळा धाडसाने आवळून धरल्याने कोल्हा पळून गेला. या घटनेमुळे कविताच्या धाडसाचे कवठेमहांकाळ परिसरात कौतुक होत आहे.

नेमकी घटना काय घडली?

सुरेखा चवरे आपली मुलगी कविता हिच्यासोबत पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी फिरायला गेल्या असताना अचानक एका पिसाळलेल्या कोल्ह्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला आणि हाताचा चावा घेतला व बोट आपल्या जबड्यात पकडून धरलं. अचानक झालेल्या या हल्ल्याने सुरेखा आणि कविता या हबकून गेल्याने. कोल्ह्याने सुरेखा यांची बोटं थेट जबड्यात धरल्याने सुरेखा यांनी जीवाच्या आकांताने टाहो फोडला.

अधिक वाचा- Love Story : ट्यूशनला जाणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडला सिक्युरिटी गार्ड; पळून जातं थाटला संसार

या सगळ्या प्रकाराने मुलगी कविता ही काही क्षण हबकून गेली. पण वेळीच स्वत:ला सावरत कविताने अतिशय धीटपणे आपल्या आईला वाचविण्यासाठी दोन्ही हाताने कोल्ह्याचा गळा आवळून धरला. ज्यामुळे सुरेखा यांना कोल्ह्याच्या तोंडातून आपली बोटं सोडवता आली. त्यानंतर दगड आणि काठीने हल्ला करून माय-लेकींनी त्या कोल्ह्याला तिथून हुसकावून लावलं.

या हल्ल्यामुळे सुरेखा चवरे यांनी आरडाओरड केल्याने तेथील ग्रामस्थांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ज्यानंतर जखमी झालेल्या सुरेखा यांना तात्काळ उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखा करण्यात आले. सुदैवाने सुरेखा यांना गंभीर इजा झाली नसल्याने त्यांच्याावर प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

अधिक वाचा- Panvel: 52 वर्षीय पार्टनर घ्यायचा संशय, लिव्ह इनमधल्या महिलेने थेट…

दरम्यान, मुलगी कविताने दाखवलेल्या धाडसाचं आणि प्रसंगावधान राखून केलेल्या कृतीचं अवघ्या पंचक्रोशीत कौतुक होत आहे. खरं तर प्रत्येक आई ही नेहमीच आपल्या मुलांसाठी जीवाच कोट करत असते. पण या घटनेत मुलीने शब्दश: आपल्या जीवाचा कोट करून आपल्या आईचे प्राण वाचवले आहे. अशा या धाडसी मुलीला मुंबई Tak चाही सलाम!

    follow whatsapp