पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा त्याच्या सामन्याची फी दहशतवाद्यांना देणार? नेमकं काय म्हणाला?

Ind vs Pak Asia Cup 2025 : पाकिस्तान सामन्यात पराभव होऊनही पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने त्यांच्या घोषणेद्वारे असं सूचित केलं की, तो अद्यापही दहशतवाद्यांना पाठीशी घाततोय.

Ind vs Pak Asia Cup 2025

Ind vs Pak Asia Cup 2025

मुंबई तक

29 Sep 2025 (अपडेटेड: 29 Sep 2025, 11:35 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

टीम इंडियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

point

आशिया कप 2025 अनेक कारणाने चर्चेत

point

पाकिस्तान कर्णधार सलमान आगाचं मोठं वक्तव्य

Ind vs Pak Asia Cup 2025 : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघादरम्यान आशिया कप 2025 चा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी पार पडला. टीम इंडियाने पाकिस्तान क्रिकेट संघाची चांगलीच जिरवली आहे. शेवटच्या षटकापर्यंत सामना गेल्यानंतर टीम इंडियाने दोन चेंडू राखून टीम इंडियाने पाकिस्तानवर विजय मिळवला. दरम्यान, यंदाचा आशिया कप अनेक कारणांनी चर्चेत आला होता. साहबजादाने केलेल्या कृत्याने हा आशिया कप आणखीच चर्चेत आला होता. त्यानंतर आता पाकिस्तान सामन्यात पराभव होऊनही पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने त्यांच्या घोषणेद्वारे असं सूचित केलं की, तो अद्यापही दहशतवाद्यांना पाठीशी घाततोय.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Maharashtra हवामानाचा अंदाज: मराठवाड्याला पावसाचा पुन्हा अलर्ट, गरज असेल तरच घरातून बाहेर पडा!

नेमकं काय म्हणाला सलमान आगा? 

पाकिस्तानच्या पराभवानंतर, अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर सलमान अली आगा म्हणाला की, "आम्ही आमच्या संपूर्ण सामन्याची फी भारतात झालेल्या अलीकडच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिक आणि मुलांना दान करु इच्छित आहोत", आगाने केलेल्या विधानाने प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे, कारण त्याचा असा अर्थ लावला जात आहे की, पाकिस्तान क्रिकेट संघ हा दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे.

पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानच्या आश्रयाने झाला. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केले, ज्यात 100 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारताला चांगलंच यश आलं. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील 10-14 जणांचा मृत्यू झाला होता. याचा अर्थ असा की कर्णधार सलमान आघा हा मसूद अझहरच्या कुटुंबाला मॅच फी देऊन मदत करु इच्छित आहे.

हे ही वाचा : Asia Cup 2025: पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवून देणारा Team इंडियाचा तिलक वर्मा आहे तरी कोण?

दरम्यान, हा आशिया कप अनेक कारणाने चर्चेत राहिलेला आहे. या आशिया कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तान खेळाडूंचे हस्तांदोलन करणं टाळलं होतं. तसेच साहबजादा इरफानने केलेल्या कृत्यामुळे अनेकजण संतापले होते. तसेच हारीस रौफने गोलंदाजी करताना एखादं क्षेपणास्त्र डागल्याचे हातवारे करत खिल्ली उडवली होती. तसेच अंतिम सामन्यातच बुमराहने आपल्या खेळातून जशास तसं प्रत्युत्तर देत फलंदाजाला बाद करून क्षेपणास्त्र पाडल्याचे हातवारे केले, ही सांकेतिक कृत्यामुळे हा आशिया कप चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला. 

    follow whatsapp