Asia Cup 2025: पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवून देणारा Team इंडियाचा तिलक वर्मा आहे तरी कोण?

मुंबई तक

India vs Pakistan Final Tilak Varma: तिलक वर्मा हा भारतीय क्रिकेटमधील नवा तारा आहे. ज्याने आशिया चषकासारख्या मोठ्या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध केलं आहे. जाणून घ्या तिलक वर्माविषयी सविस्तर.

ADVERTISEMENT

asia cup 2025 who is tilak varma who led india to a historic victory against pakistan
तिलक वर्मा (फोटो सौजन्य: Getty Images)
social share
google news

दुबई: आशिया चषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 147 धावांचं लक्ष्य दिलं होतं जे टीम इंडियाने यशस्वीरित्या गाठलं. या सामन्यात तिलक वर्माने निर्णायक खेळी करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. 147 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची अतिशय खराब सुरुवात झाली होती. पहिले तीन फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर तिलक वर्माने सुरुवातील संयमी आणि नंतर आक्रमक फलंदाजी करत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

तिलक वर्माने 53 चेंडूंत 69 धावा केल्या (3 चौकार, 4 षटकार), ज्यामुळे अटीतटीच्या समान्यात भारताने पाकिस्तानर 5 गडी राखून विजय मिळवला आणि आशिया चषक पटकावला. तिलकला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळविण्यात आला होता.

भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा तिलक वर्मा कोण?

  • पूर्ण नाव: नंबोरी थाकुर तिलक वर्मा (Namboori Thakur Tilak Varma)
  • जन्म: 8 नोव्हेंबर 2022, हैदराबाद (तेलंगणा, भारत). वय: 22 वर्षे 
  • कुटुंब: तिलकचे वडील नंबोरी नागराजू इलेक्ट्रिशियन होते, तर आई गायत्री देवी गृहिणी आहेत. ते तेलुगू कुटुंबातील आहेत. आर्थिक अडचणी असूनही, तिलकने क्रिकेटची आवड जोपासली होती.
  • प्रारंभिक प्रशिक्षण: 11 व्या वर्षी तिलक टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना कोच सलीम बयाश यांनी त्याला स्पॉट केले. बयाश यांनी लिगाला क्रिकेट अकॅडमी (लिंगमपल्ली) येथे त्यांचे प्रशिक्षण सुरू केले, फी, उपकरणे आणि प्रवासाचा खर्चही उचलला. त्यामुळे तिलकने लवकरच डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

हे ही वाचा>> दीड वर्षांचा मुलगा चौथ्या मजल्यावरून कोसळला... रुग्णालयात पाठवताना झाली वाहतूक कोंडी, नंतर तपासादरम्यानच...

क्रिकेट कारकीर्द: सुरुवात ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट

तिलक वर्मा हा डावखुरा मध्यमक्रम फलंदाज आणि ऑफ-स्पिन गोलंदाज आहे. त्याची शैली आक्रमक असून, दबावाखाली शांत राहण्याची क्षमता त्याला खास बनवते. रोहित शर्माने 2022 मध्ये त्याच्याबद्दल म्हटले होते, "तो लवकरच सर्व फॉरमॅट्समध्ये भारताचा खेळाडू बनेल."

- आंतरराष्ट्रीय कारकीर्द:

  •   - T20I डेब्यू: 3 ऑगस्ट 2023, वेस्ट इंडीजविरुद्ध. पहिल्याच सामन्यात 22 चेंडूंत 39 धावा (टॉप-स्कोरर)
  •   - ODI डेब्यू: 2023 आशिया चषकमध्ये बांगलादेशविरुद्ध (सप्टेंबर 2023).
  •     - नोव्हेंबर 2024: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिलं T20I शतक (107*, 56 चेंडू). दुसऱ्या तरुण खेळाडू म्हणून T20I शतक (सर्वाधिक तरुण).

हे ही वाचा>> Govt Job: सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणांसाठी नवी भरती! कोणतीही परीक्षा नाही अन्...

- आयपीएल कारकीर्द:

  • खरेदी: 2022 आयपीएल ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने 1.7 कोटी रुपयात खरेदी केले.
  • डेब्यू: 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (27 मार्च). राजस्थान रॉयल्सविरुद्ध 33 चेंडूंत 61 धावा.
  • 2022: 107 धावांचा सर्वाधिक स्कोअर (आरसीबीविरुद्ध).
  • 2023: आरसीबीविरुद्ध 84 (46 चेंडू).
  • 2024: 13 सामन्यांत 416 धावा (सरासरी 41.6).
  • मुंबई इंडियन्ससाठी मध्यमक्रमातील फिनिशर म्हणून ओळखला जातो. 2025 आयपीएलमध्येही तो मुंबईसाठी खेळला.

देशांर्तगत क्रिकेट:

  • पदार्पण: 2028-19 रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबादसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये (30 डिसेंबर 2018).
  • इतर पदार्पण: 2019 मध्ये विजय हजारे ट्रॉफी (लिस्ट A) आणि सैयद मुश्ताक अली ट्रॉफी (T20).
  • उल्लेखनीय कामगिरी: 2020 अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी 6 सामने खेळला. सैयद मुश्ताक अली 2021 मध्ये हैदराबादसाठी सर्वाधिक धावा (लीडिंग रन-स्कोरर).
  • दुलिप ट्रॉफी 2025-26: साऊथ झोनचा कर्णधार.

 आशिया कप 2025 फायनलमधील भूमिका: तिलक वर्मा ठरला विजयाचा शिल्पकार

  • पाकिस्तानने प्रथम 146/10 (19.1 षटके).
  • भारताने 19.4 षटकांत 150/5 ( तिलक वर्मा 69 नाबाद).
  • भारताने या सामन्यात पाकिस्तानला दोन वेळा हरवले होते (लीग आणि सुपर फोर), पण फायनल हा खरा टायटल असा सामना होता. त्यातही भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली.
  • तिलकची खेळी: सुरुवातीलाच भारताने 3 विकेट गमावल्या (अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव). त्यानंतर तिलक आणि शिवम दुबे यांनी चांगली भागीदारी केली. ज्यामुळे भारताला विजय मिळवणं सोप्पं गेलं.

तिलक वर्माविषयी काही खास गोष्टी

- शैली: दबावात शांत, इनोव्हेटिव्ह शॉट्स (रिव्हर्स स्वीप, लॉफ्टेड कव्हर ड्रायव्ह). ऑफ-स्पिन गोलंदाजी उपयोगी
- फलंदाजीचं तंत्र आणि मानसिकता: रोहित शर्मा, राहुल द्रविड यांनी तिलकच्या फलंदाजीचं तंत्र आणि मानसिकतेचे कौतुक केलं आहे.
- व्यक्तिगत आयुष्य: एकटा (अजून लग्न झालेलं नाही). नेट वर्थ अंदाजे 10-15 कोटी रुपये (आयपीएल, एंडोर्समेंट्स). तसंच तिलक हा फिटनेस आणि स्किल डेव्हलपमेंटवर भर देतो.

हे वाचलं का?

    follow whatsapp