दीड वर्षांचा मुलगा चौथ्या मजल्यावरून कोसळला... रुग्णालयात पाठवताना झाली वाहतूक कोंडी, नंतर तपासादरम्यानच...

मुंबई तक

Nalasopara news : नालासोपारा परिसरात झालेल्या एका दुर्देवी घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. वाहतूक कोंडीमुळे एका दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

nalasopara news
nalasopara news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नालासोपारा परिसरात दुर्देवी घटना

point

वाहतुकीच्या कोडींमुळे लहान बाळाचा जीव गमावला

point

नेमकं काय घडलं?

Nalasopara news : नालासोपारा परिसरात झालेल्या एका दुर्देवी घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. वाहतूक कोंडीमुळे एका दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतुकीच्या कोंडीमुळे तब्बल पाच तासांहून अधिक एक रुग्णवाहिका अडकली होती. अशा स्थितीत दीड वर्षाच्या मुलाचा जीव वाचवता आला नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मृत लहान मुलाचं नाव रियान असे आहे.

हे ही वाचा : ट्यूशनसाठी घराबाहेर पडली मुलगी, नंतर दोघांनी अपहरण करत केलं लैंगिक शोषण अन् 'त्या' ठिकाणी दिलं फेकून...

चौथ्या मजल्यावरून मुलगा कोसळला 

पेल्हार हद्दीतील रहिवासी असलेला रियान शेख गुरुवारी दुपारी चौथ्या मजल्यावरून खाली पडला होता. या अपघातात पीडित मुलाच्या पोटाला जबर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला नजीकच्या गॅलेक्सी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा तेथील डॉक्टरांनी लहान मुलाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला होता.

रियानला दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मोटारसायकलने रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या वाहतुक कोंडीमुळे मोटारसायकल अडकून बसली होती. मुंबईकडे गुजरातला जाणाऱ्या आणि गुजरातहून मुंबईला येणाऱ्या वाहनांचा वेग अधिक होता. अशा दोन्ही मार्गांवर 25 किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

हे ही वाचा : 'जयंत पाटील हे राजारामबापू यांची औलाद, काही तरी गडबड... ' गोपीचंद पडळकरांच्या 'त्या' वक्तव्याने शरद पवार गट आक्रमक

याच वाहतूक कोंडीत मोटारसायकल अडकली होती. याचमुळे मोटारसायकल पुढे नेण्यास विलंब होऊ लागला होता. त्यानंतर रियानची हालचाल थांबली, ही परिस्थिती पाहून कुटुंबियांनी जवळच्या ससूनवघर येथील रुग्णालयात नेले होते. तेव्हा डॉक्टरांनी तपास करत नंतर लहान मुलाला मृत घोषित केले. नेहमी होणारी वाहतूक कोंडी आणि या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे एका निष्पाप लहान मुलाचा मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp