'हा' आहे इंदूरीकर महाराजांचा होणारा जावई, नेमका काय आहे बिझनेस?

Indurikar Maharaj daughter engagement ceremony : इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा संपन्न, बाळासाहेब थोरातांसह बड्या नेत्यांची उपस्थिती, कोण आहे जावई?

Indurikar Maharaj daughter engagement ceremony

Indurikar Maharaj daughter engagement ceremony

मुंबई तक

05 Nov 2025 (अपडेटेड: 05 Nov 2025, 05:23 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा संपन्न,

point

बाळासाहेब थोरातांसह बड्या नेत्यांची उपस्थिती, कोण आहे जावई?

Indurikar Maharaj daughter engagement ceremony: कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख म्हणजे लोकप्रिय इंदुरीकर महाराज यांच्या कन्येचा नुकताच साखरपुडा पार पडला. ज्ञानेश्वरी असं महाराजांच्या कन्येचं नाव असून साहिल चिलप असं त्यांच्या होणाऱ्या जावयाचं नाव आहे. दरम्यान, समारंभ वसंत लॉन्स, संगमनेर येथे पार पडला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, अपक्ष आमदार सत्यजित तांबे आणि ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे उपस्थित होते. यावेळी नेते मंडळींसह सर्व उपस्थितांनी नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

हे वाचलं का?

इंदुरीकर महाराजांचे जावई कोण आहेत? 

दरम्यान, इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा पार पडल्यानंतर सोशल मीडयावर फोटो व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांनी देखील इंदुरीकर महाराजांच्या कन्येस भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, सध्या इंदुरीकर महाराजांचे जावई कोण आहेत? याबाबत चर्चा सुरु आहे. इंदुरीकर महाराजांचे जावई साहिल चिलप हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे येनेरे गावचे मूळ रहिवासी असून सध्या व्यवसायाच्या निमित्ताने नवी मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांचा वडिलोपार्जित ट्रान्सपोर्टचा मोठा व्यवसाय असून त्यांच्याकडे अनेक वाहनं आहेत. याशिवाय त्यांचा शेती आणि बांधकाम व्यवसाय असल्याचीही सोशल मीडियावर चर्चा आहे.

हेही वाचा : मुंबईची खबर: आता नागरिकांना मिळणार वीज कंपनी निवडण्याचा पर्याय! मुंबईच नव्हे तर 'या' शहरांमध्ये सुद्धा होणार उपलब्ध...

इंदुरकर महाराज मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील...

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे खरे नाव निवृत्ती काशीनाथ देशमुख आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे मूळ गाव असून, याच गावावरून त्यांना “इंदोरीकर महाराज” हे नाव लाभले. इंदोरीकर महाराज यांनी बी.एस्सी. आणि बी.एड. पर्यंत शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर त्यांनी कीर्तन क्षेत्रात प्रवेश केला आणि आपल्या विनोदी व प्रबोधनात्मक शैलीमुळे अल्पावधीतच राज्यभर लोकप्रिय झाले. महाराष्ट्रभर त्यांच्या कीर्तनांची ख्याती असून त्यांचे लाखो चाहते आहेत. त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या सोहळ्याला जिल्ह्यातील अनेक मान्यवरांसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहून आशीर्वाद दिला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

महिला डॉक्टरच्या हत्याकांडातील आरोपीबाबत धक्कादायक खुलासे, पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पतीने महिलांना पाठवले 'ते' पाच संदेश

    follow whatsapp