मुंबईची खबर: आता नागरिकांना मिळणार वीज कंपनी निवडण्याचा पर्याय! मुंबईच नव्हे तर 'या' शहरांमध्ये सुद्धा होणार उपलब्ध...

मुंबई तक

जर एखाद्या व्यक्तीला महावितरण व्यतिरिक्त इतर कोणत्याही खाजगी वीज कंपनीकडून (टाटा पॉवर, अदानी आणि टोरेंट) वीज घ्यायची असेल तर तो ती घेऊ शकतो.

ADVERTISEMENT

वीज कंपनी निवडण्याचा पर्याय!
वीज कंपनी निवडण्याचा पर्याय!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नागरिकांना मिळणार वीज कंपनी निवडण्याचा पर्याय!

point

'या' शहरांमध्ये सुद्धा होणार उपलब्ध...

Mumbai News: आता भविष्यात मुंबईप्रमाणेच ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, संभाजी नगर आणि गोवा येथील वीज ग्राहकांना एकापेक्षा अधिक वीज कंपनी निवडण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. खरं तर, अनेक वीज कंपन्या एकाच ठिकाणी वीज पुरवू शकतात. म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीला महावितरण व्यतिरिक्त इतर कोणत्याही खाजगी वीज कंपनीकडून (टाटा पॉवर, अदानी आणि टोरेंट) वीज घ्यायची असेल तर तो ती घेऊ शकतो. याला पॅरेलल डिस्ट्रीब्यूशन (समांतर वितरण) असं म्हणतात. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा पॉवरने ठाणे आणि नवी मुंबईत लायसन्स मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत.

आधीच लायसन्ससाठी अर्ज केला...

टाटा पॉवरचे सीईओ आणि एमडी डॉ. प्रवीर सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार, कलमांमध्ये सुधारणा झाल्यानंतरच ही सेवा सुरू केली जाईल. तसेच, गरज पडल्यास नवीन प्लांट स्थापन करता येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, "या सगळ्या प्रक्रियेसाठी बराच वेळ लागत असल्याकारणाने आम्ही आधीच लायसन्ससाठी अर्ज केला आहे. तसेच, काही गोष्टी या कायदेशीर विभागातूनही जातात. वितरण क्षेत्रातील कोणतीही कंपनी यासाठी अर्ज करू शकते." 

हे ही वाचा: Govt Job: 'पंजाब नॅशनल बँक'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मोठ्या पदांसाठी भरती अन् पगार सुद्धा...

कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात येणार

यामुळे, ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार कंपनी निवडण्याची संधी मिळणार आहे. नागरिक सर्व्हिस आणि खर्च यासारख्या बाबी विचारात घेऊन वीज कंपनीची निवड करू शकतात. या निर्णयामुळे कंपन्यांची मक्तेदारी देखील संपुष्टात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईला विशेष दर्जा देण्यात आला असून विविध वीज कंपन्या मुंबई शहरात एकाच वेळी वीज पुरवत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

हे ही वाचा: ब्राझीलची मॉडेल ते मतचोरी राहुल गांधींचे पुराव्यांसह सनसनाटी आरोप, आता निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर

टाटा पावरच्या सीईओ यांनी दिली माहिती...

यासंदर्भात माहिती देताना टाटा पॉवरचे सीईओ आणि एमडी डॉ. प्रवीर सिन्हा म्हणाले की, "आम्ही ठाणे आणि नवी मुंबईसह महाराष्ट्रातील बऱ्याच शहरांसाठी  पॅरेलल डिस्ट्रीब्यूशन (समांतर वितरण)  अप्लाय केलं आहे. आता कलमांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतरच ही सेवा सुरू केली जाईल." 'अदानी इलेक्ट्रिसिटी'शी बोलताना कंपनीने बऱ्याच ठिकाणी पॅरेलल डिस्ट्रीब्यूशन लायसन्ससाठी अर्ज केले असल्याचं दिसून आलं. याव्यतिरिक्त, 'टोरेन्ट' ही एक खाजगी कंपनी असून ती भिवंडी शहरात वीज पुरवठा करत असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp