ब्राझीलची मॉडेल ते मतचोरी राहुल गांधींचे पुराव्यांसह सनसनाटी आरोप, आता निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर
Haryana election commission on Rahul Gandhi : ब्राझीलची मॉडेल ते मतचोरी राहुल गांधींचे पुराव्यांसह सनसनाटी आरोप, आता निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ब्राझीलची मॉडेल ते मतचोरी राहुल गांधींचे पुराव्यांसह सनसनाटी आरोप,
आता हरियाणाच्या निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर
Haryana election commission on Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी ‘H Files’ या पत्रकार परिषदेद्वारे हरियाणा विधानसभा निवडणुकीत “मतचोरी” झाल्याचे गंभीर आरोप केले आहेत. हरियाणातील दोन कोटी मतदारांपैकी सुमारे 25 लाख मतदार बनावट आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी मतदार यादींतील फोटो दाखवत केला आहे. शिवाय, प्रत्येक 8 मतामागे 1 मत चोरीला गेल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यांनी यासाठी मतदार यादीतील काही फोटो शेअर करत अनेक पुरावे सादर केले, ज्यात एका व्यक्तीचा फोटो एकच असून नाव मात्र वेगवेगळ्या मतदारांचे असल्याचे दिसले. राहुल गांधी यांच्या या आरोपांवर आता हरियाणा निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर दिले आहे. आयोगाने राहुल गांधींचे दावे निराधार असल्याचे सांगत “X” वर एक पोस्ट केली असून त्यात 15 मुद्द्यांमध्ये मतदार यादी कशी तयार करण्यात आली याचे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा : बार्शी हादरली, स्टोलने गळा आवळला, शरीरावर 17 वार केले; विवाहितेला क्रूरपणे संपवलं
हरियाणा निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण :
1. 2 ऑगस्ट 2024 रोजी मसुदा मतदार यादी प्रकाशित करण्यात आली आणि ती सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसोबत शेअर करण्यात आली.
2. SSR दरम्यान एकूण 4,16,408 दावे आणि आक्षेप प्राप्त झाले.










