बार्शी हादरली, स्टोलने गळा आवळला, शरीरावर 17 वार केले; अनैतिक संबंधातून विवाहितेला क्रूरपणे संपवलं
Barshi Crime : बार्शी हादरली, स्टोलने गळा आवळला, शरीरावर 17 वार केले; अनैतिक संबंधातून विवाहितेला क्रूरपणे संपवलं
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बार्शी हादरली, स्टोलने गळा आवळला, शरीरावर 17 वार केले;
अनैतिक संबंधातून विवाहितेला क्रूरपणे संपवलं
Barshi Crime : शहरातील उपळाई रोडवरील शेंडगे प्लॉट येथे राहणारी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह पूनम निरफळ (वय 32) हिचा खून अनैतिक संबंधांच्या वादातून केतन प्रकाश जैन (रा. बार्शी) याने केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने प्रथम स्टोलच्या सहाय्याने पूनमचा गळा आवळला आणि नंतर धारदार शस्त्राने गळ्यावर तब्बल 17 वार करून तिचा निर्घृण खून केला. शवविच्छेदन अहवालात या सर्व जखमा स्पष्टपणे दिसून आल्या आहेत. ही धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. त्यावेळी पूनमचा पती बालाजी निरफळ हे धाराशिवला गेले होते.
दरम्यान, बालाजी निरफळ यांनी तात्काळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली. आरोपी केतन जैनविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर आरोपी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पूनमचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मंगळवारी सकाळी झालेल्या शवविच्छेदनात प्रथम गळा आवळून नंतर शस्त्राने वार केल्याचे निष्पन्न झाले. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीश गायत्री पाटील यांनी आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
हेही वाचा : शिरुरमध्ये 13 वर्षांच्या मुलासह तिघांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला गोळ्या घातल्या, वनविभागाने ठार केलं
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात केतन हा घरातून बाहेर पडताना दिसला. 5 ते 6 वर्षापूर्वी त्या दोघांनी परस्परांना मोबाइलवर केलेले संदेश आढळले अन अनैतिक संबंधातून खून झाल्याचे तपासात पुढे आले. सोमवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत पूनम यांची हत्या झाल्याचा अंदाज आहे. पूनम या आपल्या सहावीत शिकणाऱ्या मुलासह बार्शीत राहत होत्या. त्यांच्या पतींचे नोकरीच्या कारणाने दुसऱ्या जिल्ह्यात वास्तव्य होते. सोमवारी सायंकाळी पतीने फोन घेत नसल्याने ते घरी आले असता घर आतून बंद असल्याचे दिसले. त्यांनी गेटवरून घरात प्रवेश केला असता पूनम या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या.










