शिरुरमध्ये 13 वर्षांच्या मुलासह तिघांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला गोळ्या घातल्या, वनविभागाने ठार केलं

मुंबई तक

Pune Shirur Leopard shot dead by forest department :अखेर शिरुरमधील 'त्या' नरभक्षक बिबट्यावर गोळ्या झाडल्या, नागरिकांच्या संतापानंतर वनविभागाने ठार केलं

ADVERTISEMENT

Pune Shirur Leopard shot dead by forest department
Pune Shirur Leopard shot dead by forest department
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अखेर शिरुरमधील 'त्या' नरभक्षक बिबट्यावर गोळ्या झाडल्या

point

नागरिकांकडून झालेल्या तीव्र आंदोलनानंतर वनविभागाने ठार केलं

Pune Shirur Leopard shot dead by forest department : पुण्याच्या शिरुर तालुक्यातील पिंपरखेड व परिसरामध्ये धुमाकूळ घालणा-या बिबट्याला अखेर ठार करण्यात यश आले आहे. शिरुरमधील 13 वर्षीय मुलाचा बिबट्यामुळे बळी घेतल्यानंतर संपूर्ण गाव आक्रमक झाले होते. संतप्त जमावाने वनविभागाची गाडी देखील जाळली होती. त्यानंतर राज्य सरकार बिबट्याचा प्रश्न सोडवण्यास सक्रिय झाले होते. दरम्यान, मंगळवारी दिवसभर या परिसरात ठीक ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याच्या भ्रमण मार्गावरील ठशांचे निरीक्षण करण्यात आले होते. त्यानंतर रात्री तीन थर्मल ड्रोनच्या माध्यमातून घटनास्थळाच्या परिसरामध्ये त्या नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला असता घटनास्थळापासून सुमारे 400 ते 500 मीटर अंतरावर सदर बिबट्या दिसून आला. रेस्क्यू टीमने त्यास बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला. परंतु तो अपयशी ठरल्याने बिबट चवताळून प्रति हल्ला करत असताना बंदूकधारी शार्प शूटरने त्यावर रात्री 10.30 वाजता च्या सुमारास गोळी झाडल्याने सदर नर बिबट्या मृत झाला.

मागील 20 दिवसात या परिसरात बिबट्याफच्या हल्यात तिघांचा मृत्यू झाला होता. यात शिवन्या शैलेश बोंबे, (वय 5 वर्ष) भागुबाई रंगनाथ जाधव, (वय 82 वर्षे) आणि रोहन विलास बोंबे (वय 13 वर्षे) यां तिघांचा समावेश आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळून जुन्नर,शिरूर, आंबेगाव व खेड तालुक्यामधील नागरिकांनी मंचर येथे पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरत तीव्र आंदोलन केले होते. संतप्त जमावाणे वनविभागाच्या गस्ती वाहन तसेच येथील स्थानिक बेस कॅम्प इमारत पेटवून देऊन मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली होती. संतप्त नागरिकांनी दिनांक 3/11/2025 रोजी पुणे नाशिक महामार्ग सुमारे 18 तास रोखून धरला होता. नरभक्षक झालेल्या पिंपरखेड परिसरातील वन्यप्राणी बिबट्यास जेरबंद किंवा ठार करण्यासाठी पुणे येथील वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी तातडीने प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांची परवानगी घेतली होती.

हेही वाचा : तुमच्या जिल्ह्यातील 'या' नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी होणार निवडणुका! तारीखही जाहीर

सदर नरभक्षक बिबट्या जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू संस्था पुणेचे डॉ. सात्विक पाठक पशु चिकीत्सक, जुबिन पोस्टवाला व डॉक्टर प्रसाद दाभोळकर या दोन शार्प शूटरसह वनविभागाची टीम घटनास्थळ परिसरात तैनात करून सदर नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. मृत बिबट्याचे वय अंदाजे पाच ते सहा वर्ष असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर सदर नरभक्षक बिबट्याचे शव मौजे पिंपरखेड येथील ग्रामस्थांना दाखविण्यात आले त्यानंतर सदर शव शवविच्छेदना करिता माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले. सदर कार्यवाही श्री आशिष ठाकरे वनसंरक्षक वनवृत्त पुणे यांचे मार्गदर्शनाखाली प्रशांत खाडे उपवनसंरक्षक जुन्नर, स्मिता राजहंस व श्री अमृत शिंदे सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर, निळकंठ गव्हाणे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर व रेस्क्यू संस्थेचे सदस्य यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी केले.

हे वाचलं का?

    follow whatsapp