Govt Job: 'पंजाब नॅशनल बँक'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मोठ्या पदांसाठी भरती अन् पगार सुद्धा...
पंजाब नॅशनल बँक (PNB) कडून लोकल बँक ऑफिसर (LBO) च्या एकूण 750 पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'पंजाब नॅशनल बँक'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!
मोठ्या पदांसाठी भरती अन् पगार सुद्धा...
PNB Recruitment 2025: सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणांसाठी नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) कडून लोकल बँक ऑफिसर (LBO) च्या एकूण 750 पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी 3 नोव्हेंबर रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 23 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
किती मिळेल वेतन?
या भरतीमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 48,480 रुपये ते 85,920 रुपये वेतन दिलं जाईल.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी किमान 20 वर्षे आणि कमाल 30 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येणार असून एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे तसेच ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे सूट देण्यात येणार आहे. याशिवाय, अपंग उमेदवारांना सुद्धा उच्च वयोमर्यादेत 10 वर्षे सूट देण्यात येईल.
शैक्षणिक पात्रता
संबंधित पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून ग्रॅज्युएशन किंवा त्या संबंधित पदवी असणं अनिवार्य आहे.










