IPL 2025 New Schedule Announced : आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांबद्दल नवीन शेड्युल जाहीर करण्यात आला आहे. आयपीएलच्या बाकी राहिलेल्या 17 सामन्यांची सुरुवात 17 मे पासून होणार आहे. तर 3 जूनला आयपीएलची फायनल होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत आयपीएलच्या नॉक आऊट सामन्यांच्या वेन्यूची घोषणा करण्यात आली नाहीय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने आयपीएलचे सामने एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले होते.
ADVERTISEMENT
असं आहे आयपीएलचं नवं शेड्युल
आयपीएलच्या नव्या शेड्युलनुसार, 17 मे रोजी बंगळुरु आणि कोलकाता यांच्यात होणारा सामना बंगळुरुमध्ये खेळवला जाणार आहे. तर लीग स्टेजचा शेवटचा सामना लखनऊ आणि बंगळुरु यांच्यात होणार आहे. हा सामना लखनऊमध्ये खेळवण्यात येणार आहे. जयपूरमध्ये लीगचा कोणताही सामना खेळवला जाणार नाही, असं बोललं जात होतं. परंतु, बोर्डाने ज्या सहा शहरांची निवड केली आहे, यामध्ये जयपूरचा समावेश आहे. आयपीएल 2025 चे इतर सामने बंगळुरु, जयपूर, दिल्ली, लखनऊ, मुंबई आणि अहमदाबातमध्ये खेळवण्यात येणार आहेत.
हे ही वाचा >> भारतात खळबळ उडवून देणारी Inside स्टोरी, पाकिस्तान दहशतवादी मसूद अझहरला देणार तब्बल 14 कोटी!
आयपीएलचा क्वालिफायर 1 चा सामना 29 मे रोजी खेळवला जाणार आहे. तर 30 मे रोजी एलिमिनेटर सामना होणार आहे. दुसरा क्लालिफायरचा समान 1 जूनला आणि फायनलचा सामना 3 जूनला रंगणार आहे. दरम्यान, प्ले ऑफचे सामने कुठे खेळवले जाणार? याबाबत अद्यापही घोषणा करण्यात आली नाहीय.आयपीएलच्या शेड्युलची घोषणा करत प्रेस रिलीजमध्ये म्हटलंय, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)ला टाटा आयपीएल 2025 पुन्हा सुरु करून आनंद होत आहे. सरकार आणि सुरक्षा एजन्सी आणि सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर बोर्डाने आयपीएलचा हंगाम सुरु करण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा >> ऑनलाईन चाकू मागवला, स्वत:ला संपवलं! चिठ्ठीमध्ये शिक्षणमंत्र्यांकडे काय मागणी केली?
एकूण 17 सामने 6 ठिकाणी खेळवले जाणार आहेत. 17 मे 2025 पासून या सामन्यांची सुरुवात होणार आहे आणि 3 जून 2025 रोजी फायनचा सामना खेळवला जाणार आहे. या शेड्युलमध्ये दोन डबल हेडरचा समावेश आहे. जे दोन रविवारी खेळवले जातील. प्ले ऑफच्या इतर सामन्यांच्या तारखांची घोषणा नंतर केली जाईल. तसच या सामन्यांचे वेन्यूही काही दिवसांनतर निश्चित करण्यात येतील. बीसीसीआय पुन्हा एकदा भारताच्या सैन्य दलांच्या धाडसी नेतृत्त्वाला सॅल्यूट करतं.
ADVERTISEMENT
