भारतात खळबळ उडवून देणारी Inside स्टोरी, पाकिस्तान दहशतवादी मसूद अझहरला देणार तब्बल 14 कोटी!

मुंबई तक

पाकिस्तान सरकार दहशतवादी मसूद अझहरला तब्बल 14 कोटी रुपयांची भरपाई देणार आहे. पाकिस्तान अशाप्रकारची मदत का करणार? याविषयी जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

इस्लामाबाद: भारताने अलीकडेच पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी घोषित केलेला मसूद अझहर याच्या कुटुंबाला मोठी आर्थिक भरपाई मिळण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतीय हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक नागरिकाच्या कायदेशीर वारसाला 1 कोटी रुपये (10 दशलक्ष पाकिस्तानी रुपये) देण्याची घोषणा केली आहे. 

या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, ज्यामध्ये त्याची मोठी बहीण, तिचा पती, पुतणी  पुतण्या आणि त्यांची पत्नी तसेच अनेक मुले यांचा समावेश आहे, असे पाकिस्तानच्या 'डॉन' आणि 'असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान' (APP) या वृत्तसंस्थांनी नमूद केले आहे.

जर मसूद अझहर हा एकमेव कायदेशीर वारस असेल, तर त्याला तब्बल 14 कोटी रुपये मिळू शकतात, अशी शक्यता आहे. या घोषणेमुळे पाकिस्तान सरकारच्या दहशतवादाविषयीच्या धोरणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

भारताचे अचूक हवाई हल्ले आणि पाकिस्तानची भरपाई योजना

भारतीय हवाई दलाने 7 मे रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर येथील दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले होते. हे तळ जैश-ए-मोहम्मदचा गड मानले जातात आणि येथे जमिया मस्जिद सुभान अल्लाह, ज्याला उस्मान-ओ-अली कॅम्पस असेही म्हणतात, हे JeM चं मुख्यालय आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp