जळगाव हादरलं! क्षुल्लक वादातून 64 वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हत्या,भाच्याने...

Jalgaon crime : जळगाव शहरातील शामनगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीने वृद्ध व्यक्तीवर दगडाने हल्ला करत डोके ठेचून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.

Jalgaon crime

Jalgaon crime

मुंबई तक

• 02:23 PM • 09 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

शामनगर रेल्वे परिसरात वृद्धाचा मृतदेह आढळला

point

भाच्याने मृतदेहाची ओळख पटवली 

Jalgaon Crime : मनीष जोग - जळगाव शहरातील शामनगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीने वृद्ध व्यक्तीवर दगडाने हल्ला करत डोके ठेचून निर्घृण हत्या केली. मृत व्यक्तीची ओळख जीवन शालीक पाथकर उर्फ जीवन मिस्तरी (वय 64) अशी आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले, संबंधित प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : जून ते ऑगस्ट महिन्यात 'या' राशींना पैसा मिळेल, काय सांगतं राशीभविष्य?

शामनगर रेल्वे परिसरात वृद्धाचा मृतदेह आढळला

पोलिसांच्या माहितीनुसार, जीवन मिस्तरी हे गेल्या अनेक वर्षांपासून जळगावात राहत होते. त्यांच्या आईच्या निधनानंतर ते एकाकी पडले. ते कचरा वेचून ते आपला उदरनिर्वाह चालवत. शामनगर रेल्वे परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. संबंधित घटनेची माहिती मिळताच, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी जितेंद्र राजपूक आणि अजित पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला. नंतर मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. 

हे ही वाचा : जैन मुनींसाठी पांढरी पट्टी, वाद विकोपाला; दोन्ही पक्ष समोरासमोर, पाहा व्हिडीओ

भाच्याने मृतदेहाची ओळख पटवली 

 

दरम्यान, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आणलेल्या मृतदेहाची ओळख भाचा तुषार सुतारने पटवून दिली. नंतर रामानंद नगर पोलिसांनी वेगाने तपास करत एका संशयिताला ताब्यात घेतले, मात्र दुसरा आरोपी हा फरार असून पोलीस त्याचाच शोध घेत आहेत.