जळगाव : लग्नसमारंभातील जल्लोष अचानक शोकांतिकेत बदलल्याची हृदयद्रावक घटना अमळनेर तालुक्यातील नालखेडा येथे 21 नोव्हेंबरच्या रात्री घडली. नातलगाच्या लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात बॅण्डच्या तालावर डान्स करत असताना एका तरुणाचा अचानक मृत्यू झाला. अतुल ज्ञानेश्वर कोळी (वय 25, रा. निंभोरा, ता. धरणगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
ADVERTISEMENT
घटनेच्या रात्री हळदीचा कार्यक्रम सुरू असताना आनंदाचं वातावरण होतं. वऱ्हाडी मंडळी, नातेवाईक आणि उपस्थित तरुणाई नृत्यात रमली होती. याच दरम्यान अतुलही आनंदात नाचत होता. अचानक तो सर्वांच्या नजरेसमोर कोसळला. सुरुवातीला हा काही क्षणांचा थकवा किंवा चक्कर असेल असे वाटले, मात्र तो उठत नसल्याचे दिसताच उपस्थितांची धावपळ सुरू झाली.
हेही वाचा : तीन मुलांच्या आईचे विवाहबाह्य संबंध! गर्भात प्रियकराचं बाळ अन् महिलेचा 'तो' हट्ट, अखेर घडलं भयानक...
उपस्थितांनी तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात उपाचारांसाठी नेले. डॉक्टरांनी तपासणी केली असता अतुलला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. त्यामुळे समारंभातील जल्लोष क्षणार्धात दुःखात परिवर्तित झाला. नातेवाईकांवर शोककळा पसरली तर लग्नघरात शांतता पसरली. हळदीच्या कार्यक्रमातील हा दुर्दैवी प्रसंग पाहून सर्वजण हादरले.
अतुल हा ज्ञानेश्वर कोळी दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. आई-वडिलांचा आधारस्तंभ असलेल्या अतुलने अचानक सोडून गेल्याने कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. गावातही या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून तरुण वयात झालेल्या मृत्यूमुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
लग्नसमारंभातील हळदीसारख्या आनंदी क्षणी घडलेल्या या मृत्यूने उपस्थितांना भावनिक धक्का बसला आहे. आनंदाने भरलेला क्षण काही क्षणातच शोकाकुल बनल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू असून तरुणाच्या अचानक मृत्यूमागील कारणांबाबत पुढील तपास सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











