Nagpur Crime : मोबाईलच्या अतिवापरात मोठी वाढ झालेली आहे. याचे सर्वाधिक प्रमाण हे लहान मुलांच्याबाबतीत दिसून येत आहे. मोबाईलचा योग्य वापर असावा, पण मोबाईलच्या अतिवापराने लहान मुलांना व्यसन लागलेलं आहे. या व्यसनामुळे आता लहान मुलं आपली तहान भूक विसरून त्या चाकोरीत अडकून केले आहेत. आता तर काही मुलं आपल्या आई-वडिलांकडे मोबाईलची मागणी करू लागले आहेत. जर मोबाईल देण्यास नकार दिल्यास हट्टीपणा करतात आणि नंतर होत्याचं नव्हतं होऊन बसतं. अशीच एक घटना समोर आली आहे. एका मुलीला मोबाईल न दिल्याने लहान विद्यार्थिनीने आत्महत्या करत टोकाचं पाऊल उचललं आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जालना हादरलं! जून्या वादाचा राग हल्लेखोरांच्या मनात, 6 टोळक्यांकडून बाप-लेकाला बेदम मारहाण, 57 वर्षीय बापाचा अंत
नेमकं काय घडलं?
आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव दिव्या सुरेश कोठारे (वय 13) असे आहे. चणकापूर येथे जय भोलेनगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी घडली. तसेच वॉर्ड क्रमांक 6 हनुमाननगर येथे राहते. तसेच दिव्या ही चणकापूर येथे वॉर्ड क्रमांक 1 येथील महात्मा फुले शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेत होते.
24 नोव्हेंबर रोजी तिच्या आत्याच्या मुलीचे लग्न असल्याने शुक्रवारी दिव्या आणि तिचे आई-वडील तसेच तिच्या कुटुंबीय आत्याकडे कार्यक्रमासाठी गेले होते. दिव्याची आत्या ही तिच्या घरापासून काही अंतरावरच राहते. दिव्याने सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मोबाइलची मागणी केली, मोबाईल न दिल्याने दिव्या नाराज झाली.
मोबाईल न दिल्याने गळ्याचा दोर आवळला
तिची आत्या ही तिच्या घरापासून काही अंतरावर राहते. दिव्याने सायंकाळी साडेतीन वाजल्याच्या सुमारास मोबाईल मागितला. तेव्हा दिव्याला मोबाईल न दिल्याने दिव्या हिरमसून गेली. रागाच्याभरातच ती घरात गेली असता, तिथे कोणीच नव्हते. तेव्हा तिने पाळण्याच्या दोरीला गळफास घेत दोर आवळला.
हे ही वाचा : बुध ग्रहाच्या उदयामुळे काही राशीतील लोकांच्या हातात सतत खेळत राहील पैसा, काय सांगतं राशीभविष्य?
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या ही सोशल मीडियाचा देखील वापर करत होती. मोबाईलच्या अधिक वापराने तिचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचं तिच्या काकांचं म्हणणं आहे. मोबाईलचा वापर कमी करून अभ्यासाकडे लक्ष देण्यास त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT











