जालना हादरलं! जून्या वादाचा राग हल्लेखोरांच्या मनात, 6 टोळक्यांकडून बाप-लेकाला बेदम मारहाण, 57 वर्षीय बापाचा अंत
Jalna crime : जालन्यामध्ये एक मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जून्या झालेल्या एका वादाचा राग मनात धरून वडील आणि मुलाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जालन्यामध्ये एक मन हेलावून टाकणारा
6 जणांनी मिळून मुलासह वडिलांना केली मारहाण
संशयितांची नावे समोर
Jalna crime : जालन्यामध्ये एक मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जून्या झालेल्या एका वादाचा राग मनात धरून वडील आणि मुलाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत वडीलांचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव लक्ष्मण कांबळे (वय 57) असे आहे. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील शेवता शिवारात ही धक्कादायक घटना घडलीय. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : बुध ग्रहाच्या उदयामुळे काही राशीतील लोकांच्या हातात सतत खेळत राहील पैसा, काय सांगतं राशीभविष्य?
संशयितांची नावे समोर
या झालेल्या हल्ल्यात लक्ष्मण कांबळेंचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी शशिकांत कांबळे (वय 35) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीतून संशयित आरोपी राहुल सखाराम सोनवणे, विकास सखाराम सोनवणे, सखाराम विश्वनाथ सोनवणे, कमलबाई सखाराम सोनवणे, अनिता राहुल सोनवणे आणि कल्पना विकास सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6 जणांनी मिळून शशिकांत कांबळेंसह वडिलांना मारहाण
मृत व्यक्ती लक्ष्मण कांबळे आणि त्यांचा मुलगा शशिकांत कांबळे यांचा आरोपींशी यापूर्वी वादंग निर्माण झाला होता. नंतर त्या वादाचे रुपांतर भांडणात होऊन नंतर मारहाण झाली. याच जून्या वादाचा मनात राग धरून 6 जणांनी मिळून शशिकांत कांबळे आणि त्याचे वडील लक्ष्मण कांबळेंना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली. या झालेल्या हल्ल्यात लक्ष्मण कांबळेंचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा : कोल्हापूर : पतीच्या खूनासाठी पत्नीची 5 जणांना सुपारी, बॉडी पोत्यात भरुन नदीत फेकली, पुरावेही साफ पण नंबर प्लेटने गेम
दुर्दैवी घटनेनं परिसरात एकच खळबळ
या प्रकरणी शशिकांत कांबळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीतून संशयित आरोपी राहुल सखाराम सोनवणे, विकास सखाराम सोनवणे, सखाराम विश्वनाथ सोनवणे, कमलबाई सखाराम सोनवणे, अनिता राहुल सोनवणे आणि कल्पना विकास सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात घटनेचा तपास पोलीस करताना दिसत आहेत. या दुर्दैवी घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.










