कोल्हापूर : पतीच्या खूनासाठी पत्नीची 5 जणांना सुपारी, बॉडी पोत्यात भरुन नदीत फेकली, पुरावेही साफ पण नंबर प्लेटने गेम
Kolhapur Crime : राधानगरीत खून अन् मृतदेह निपाणीतील नदीत, पतीला संपण्यासाठी पत्नीचं फुल-टू प्लानिंग, पण नंबर प्लेटमुळे झाला गेम...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोल्हापूर : पतीच्या खूनासाठी पत्नीची 5 जणांना सुपारी
बॉडी पोत्यात भरुन नदीत फेकली
पुरावेही साफ पण नंबर प्लेटने गेम
Kolhapur Crime : करवीर तालुक्यातील पाचगाव येथे राहणाऱ्या शामराव यांच्या दारूच्या व्यसनामुळे घरात सतत कलह सुरू होता. नशेत वारंवार पत्नीवर हल्ले, शिवीगाळ आणि मारहाण सुरू असल्याने ती पूर्णपणे हैराण झाली होती. अखेर सततच्या अत्याचाराला कंटाळून तिने बहिणीच्या मुलाशी संपर्क साधला. ‘या माणसाचा कायमचा बंदोबस्त कर, अन्यथा माझं आयुष्य संपेल,’ अशी विनवणी करून तिने त्याला मदतीसाठी तयार केले. यावर त्या तरुणाने आपल्या ओळखीतील चार मित्रांना राधानगरी तालुक्यातील गुडाळ गावात बोलावले. यापैकी दोन जण निपाणीचे, तर उर्वरित दोघे तासगाव, सांगलीतील होते. पैशांचे आमिष दाखवताच हे सर्वजण शामरावला संपवण्यासाठी तयार झाले. काही दिवसांतच 18 जुलैच्या रात्री त्यांनी शामरावला गुडाळ येथे आमिष दाखवून बोलावले. शेताच्या आडोशाला नेऊन सर्वांनी मिळून त्याला बेदम मारहाण केल्यानंतर नायलॉनच्या दोरीने गळा दाबून त्याचा खून केला. त्या रात्रीच मृतदेह पोत्यात भरून पाचहीजण तीन दुचाकींवरून निपाणीच्या दिशेने रवाना झाले. यमगर्णी गावाजवळ नदीच्या प्रवाहात पोते फेकत त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. खुनानंतर तासगावमधील एका तरुणाने शामरावची दुचाकी स्वतःकडे ठेवली आणि गावात प
दरम्यान, 25 जुलैला पत्नीने करवीर पोलिस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची नोंद केली. दुसऱ्याच दिवशी निपाणी ग्रामीण पोलिसांना यमगर्णी नदीपात्रात एका पुरुषाचा मृतदेह आढळला. तो शामरावच असल्याचे नंतर स्पष्ट झाले. गळा आवळून खून झाल्याचे दिसत असतानाही प्रकरण आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदले गेल्याने तपासात मोठी ढिलाई राहिली.
यानंतर 30 जुलैला तासगाव पोलिस गस्त घालत असताना भिलवडी नाका परिसरात संशयास्पद रित्या वावरणाऱ्या दुचाकीस्वाराला त्यांनी थांबवले. कागदपत्रांची मागणी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंबर प्लेट तपासली असता ती बनावट असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी कडक चौकशी केली असता शेवटी त्याने दुचाकी कोल्हापूरमधील मित्राकडून आणल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मूळ नंबर तपासल्यावर दुचाकी ही मृत शामरावची असल्याचे समोर आले. यातून खुनाचा धागा पोलिसांना मिळाला. खोलात जाऊन चौकशी केली असता त्या तरुणाने गुन्ह्याची कबुली दिली. गुडाळ येथे शामरावची हत्या करून त्याची दुचाकी ताब्यात घेतल्याचे त्याने मान्य केले. पुढील तपासात या कटाच्या मुळाशी शामरावची पत्नीचं असल्याचे उघड झाले. तिच्या सांगण्यावरूनच बहिणीच्या मुलाने आणि त्याच्या मित्रांनी खून घडवून आणला होता.
खुनात सहभागी झालेल्या पाचही तरुणांचे वय अवघे 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान होते. डान्स ग्रुपमधून त्यांची ओळख झाली होती. चुकीच्या संगतीत गेलेले हे तरुण पैशांच्या मोहात पडून संपूर्ण आयुष्य अंधारात ढकलून बसले. या प्रकरणाचा तपास तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, सांगली पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, तासगावचे उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, कॉन्स्टेबल शैलेंद्र कोरवी, दरिबा बंडगर आणि योगेश यादव यांनी गुन्ह्याचा धांडोळा घेत आरोपींना गजाआड केले. विशेष म्हणजे, तासगाव पोलिसांनी बनावट नंबर प्लेटचा धागा पकडला नसता, तर हा खून कदाचित कायम रहस्यच राहिला असता. दुचाकीच्या तपासातून सुरु झालेला धागा थेट राधानगरीतल्या खुनापर्यंत पोहोचला आणि संपूर्ण कट उघडकीस आला.










