Exit Poll: पाहा महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कोणाची सत्ता?, एक्झिट पोलमधील चक्रावून टाकणारे आकडे
महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत महायुतीचा दबदबा दिसून येत आहे. रुद्रा एक्झिट पोलमध्ये 29 महापालिकांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पाहा कोणत्या महापालिकेत कोणाची सत्ता येईल.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीनंतर राजकीय वातावरण तापले असून, 'रुद्रा रिसर्च आणि अॅनालिटिक्स'ने जारी केलेल्या एक्झिट पोलने (Exit Poll) सर्वच पक्षांना धक्का बसला आहे. या पोलनुसार, महायुती (भाजप + शिवसेना शिंदे गट +) हे राज्यातील बहुतेक महापालिकांमध्ये आघाडीवर असल्याचे दिसते. तर काही ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही सत्ता मिळवित असल्याचं चित्र आहे. दुसरीकडे शिवसेना UBT, मनसे, काँग्रेस हे दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. तर अपक्ष आणि इतर पक्षांना मर्यादित यश मिळण्याचा अंदाज आहे. राज्यातील या निवडणुका आज पार पडल्या असून, विकास, स्थानिक मुद्दे आणि राजकीय युतींच्या प्रभावाने मतदारांनी आपला कौल दिल्याचे संकेत आहेत.
रुद्रा एक्झिट पोलने मतदारांच्या प्रतिसादावर आधारित हा अंदाज जारी केला असून, यात पक्षनिहाय जागा वाटप सादर करण्यात आले आहे. एकूण 29 महापालिकांमध्ये नेमक्या कोणाला किती जागा मिळतील याचा नेमका आकडा देण्यात आला आहे. या एक्झिट पोलनुसार, महायुतीला राज्यभरात यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, हा केवळ एक्झिट पोल असून, प्रत्यक्ष निकाल वेगळा येऊ शकतो.
हे ही वाचा>> Rudra Exit Poll: मुंबईत भाजप सर्वाधिक जागा मिळवणार, पाहा कोणत्या पक्षाला किती जागांवर मिळणार विजय
रुद्रा एक्झिट पोलनुसार भाजप राज्यातील सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरू शकतो, ज्यात मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये त्यांचा दबदबा दिसतो. शिवसेना शिंदे गटाने ठाणे, कल्याण-डोंबिवली यांसारख्या भागात मजबूत पकड दाखवली आहे. शिवसेना यूबीटी आणि काँग्रेसला मर्यादित यश मिळाले असले तरी, ते काही महापालिकांमध्ये आव्हान देताना दिसतात. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना एकूणच कमी जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इतर पक्ष आणि अपक्ष महत्त्वाची भूमिका बजावता येऊ शकते, विशेषतः वसई-विरार, मालेगाव यांसारख्या ठिकाणी.
हे ही वाचा>> Mumbai BMC Exit polls 2026 live: ठाकरे मुंबईची सत्ता गमावणार, एक्झिट पोलमध्ये भाजप फडकवणार मुंबईवर आपला झेंडा
महायुती राज्यातील बहुतेक महापालिकांमध्ये बहुमत मिळवण्याच्या स्थितीत आहे. तर अनेक महापालिकांमध्ये महाविकास आघाडीला विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागू शकते. मनसे आणि इतरांना काही जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ते किंगमेकरची भूमिका बजावू शकतात. एकूण जागांच्या बाबतीत, राज्यातील महापालिकांमध्ये महायुतीचं वर्चस्व दिसतं.










