Mumbai BMC Exit polls 2026 live: ठाकरे मुंबईची सत्ता गमावणार, एक्झिट पोलमध्ये भाजप फडकवणार मुंबईवर आपला झेंडा
LIVE Mumbai BMC Exit Results 2026 Updates: मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर डीव्ही रिसर्चचा जो एक्झिट पोल समोर आला आहे त्यामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे मुंबईवर सत्ता मिळवतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी (BMC Election)आज (15 जानेवारी) मतदान पार पडलं. ज्यानंतर आता या निवडणुकींचे Exit Poll समोर आले आहेत. राज्यात आज 29 महानगरपालिकांसाठी मतदान घेण्यात आलं. पण अवघ्या राज्याचं लक्ष मुंबई महापालिकेकडे लागून राहिलं आहे. अशातच आता मुंबई महापालिका निवडणुकीचे एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. डीव्ही रिसर्च यांचा एक्झिट पोल हा आता समोर आली आहे.
पाहा DV Research चा एक्झिट पोल
डीव्ही रिसर्चच्या एक्झिट पोलमध्ये भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांना 107 ते 122 जागांसह बहुमत मिळवण्याच्या दिशेने असल्याचा अंदाज डीव्ही रिसर्चच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे. या एक्झिट पोलनुसार, भाजप-शिवसेनेला 41 टक्के मतदान मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शिवसेना UBT-मनसे 68 ते 83 जागांसह 33 टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे ही वाचा>> 'शाई'मुळे लोकशाही धोक्यात? मार्कर पेनचा वाद, पुसली जाणारी शाई अन्... नेमकं खरं काय?
हे एक्झिट पोल आज, मतदान दिवशीच घेण्यात आले असून, उद्या 16 जानेवारीला अधिकृत निकाल जाहीर होणार आहेत. या अंदाजामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. डीव्ही रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडने जारी केलेल्या या एक्झिट पोलचे उद्दिष्ट मतदारांच्या वर्तन, प्राधान्यक्रम आणि मतदान पद्धतींचे मूल्यमापन करणे हे आहे. या अभ्यासात सर्व 227 वॉर्डांमध्ये आघाडी-आघाडीप्रमाणे मतदान हिस्सा आणि जागा प्रोजेक्शनचा अंदाज घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विस्तृत फ्रेमवर्क तयार केला आहे. यात एकूण 26570 जणांचा या एक्झिट पोलचा समावेश आहे. हे सर्व मतदान केलेल्या मतदार आहेत.










