खाकी वर्दीची प्रतिमा मलीन करणारा प्रकार, बीडमध्ये पोलीस दलातील कर्मचाऱ्याने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत केलं लैंगिक शोषण
Beed crime : समाजाच्या रक्षणाची ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी असते, अशाच एका पोलीस दलातील कर्मचाऱ्याने एका तरुणीचा विश्वासघात केल्याची धक्कादायक घटना घडली. लग्नाचे आमिष दाखवून एका 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. या प्रकरणी नराधम पोलीस कर्मचाऱ्याविरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पोलीस दलातील सैनिकानं तरुणीशी जवळीकता साधली
लग्नाचं आमिष दाखवून केलं लैंगिक शोषण
Beed Crime : समाजाच्या रक्षणाची ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी असते, अशाच एका पोलीस दलातील कर्मचाऱ्याने एका तरुणीचा विश्वासघात केल्याची धक्कादायक घटना घडली. लग्नाचे आमिष दाखवून एका 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. या प्रकरणी नराधम पोलीस कर्मचाऱ्याविरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनं संपूर्ण बीड हादरून गेलं आहे. या घटनेनं पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचं चित्र आता समोर आलं आहे.
हे ही वाचा : नीट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीच्या गुप्तांगाला दुखापत, हॉस्टेलमध्ये बेशुद्घावस्थेत आढळली, कुटुंबीय म्हणाले...
पोलीस दलातील सैनिकानं तरुणीशी जवळीकता साधली
घडलेल्या घटनेनुसार, पीडित तरुणी आष्टी तालुक्यातील एका गावातील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपी हा पीडितेच्या घरानजीकच राहतो. तो पीडितेला ओळखत होता, त्याचाच फायदा घेत त्यानं पीडितेशी जवळीकता साधली आणि तिला लग्नाचे आमिष दाखवले. पीडितेचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने तिला लग्नाचे आश्वासन दिले होते. पीडितेच्या आई-वडील घरी नसताना किंवा संधी मिळेल तेव्हा आरोपीने पीडितेच्या घरात जाऊन तिच्यावर अनेकदा संशय व्यक्त केला होता. तिने अनेकदा पीडितेचे लैंगिक शोषण केले होते. याच काळात पीडितेनं त्याला अनेकदा लग्नाविषयी विचारले असता, तेव्हा तो काहीबाही सांगून विषय टाळून द्यायचा.
लग्नाचं आमिष दाखवून केलं लैंगिक शोषण
काही दिवसांपूर्वी पीडितेनं लग्नासाठी पोलिसांकडे तगादा लावून धरला होता. तेव्हा आरोपीने लग्नास नकार दिला होता. पीडितेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी अंभोरा पोलीस ठाणे गाठलं आणि आपल्यासोबत घडलेला एकूण प्रकार सांगितला. पीडितेनं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे करत आहेत. आरोपी सुट्टीवर असताना त्यानं हे कृत्य केले, तसेच यात इतर काही बाबी आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत.










