पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीची आत्महत्या, दु:खद घटनेनंतर पंकजा ताईंचा बीड दौरा रद्द

मुंबई तक

Pankaja Munde PA Anant Garje wife commits suicide : पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीची आत्महत्या, दु:खद घटनेनंतर पंकजा ताईंचा बीड दौरा रद्द

ADVERTISEMENT

Pankaja Munde PA Anant Garje wife commits suicide
Pankaja Munde PA Anant Garje wife commits suicide
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीची आत्महत्या

point

दु:खद घटनेनंतर पंकजा ताईंचा बीड दौरा रद्द

बीड : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉक्टर गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचा नुकताच, म्हणजे ७ फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता. मात्र, वरळीतील निवासस्थानी त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली. ही घटना काल संध्याकाळी सुमारे सातच्या सुमारास उघडकीस आली. घरातील कौटुंबिक कलहातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे. वरळी पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

गौरी पालवे या वरळी बीडीडी येथे राहात होत्या आणि केईएम रुग्णालयाच्या डेटिस विभागात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. आत्महत्येनंतर त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा : पैठण : बापाचा खून करुन मृतदेह घरात पुरला,भोळसर आईला धमकी देऊन गप्प केलं, 8 दिवसांनी उग्र वास अन्..

हे वाचलं का?

    follow whatsapp