अंबरनाथः उड्डाणपुलावर झालेल्या ‘त्या’ भयंकर अपघातातून शिवसेना उमेदवार थोडक्यात बचावल्या, ड्रायव्हरला अटॅक आला अन्…
अंबरनाथ येथील उड्डाणपुलावर भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. या अपघातातून शिवसेना उमेदवार किरण चौबे थोडक्यात बचावल्या.
ADVERTISEMENT

अपघातात
अंबरनाथः अंबरनाथमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले.
मृतांमध्ये अंबरनाथ नगर परिषदेचे दोन कर्मचारी, कार चालक आणि एका १७ वर्षीय तरुणाचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या उमेदवार किरण चौबे त्यांच्या चालक लक्ष्मण शिंदे यांच्यासोबत निवडणूक प्रचारासाठी बुवा पाडा परिसरात जात होत्या.
रस्त्यात शिंदे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे कारचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित कार दुभाजक ओलांडून सुमारे चार ते पाच वाहनांना धडकली, असे शिवसेनेचे उमेदवार किरण चौबे यांनी पोलिसांना सांगितले.










