अनेक पुरुषांसोबत अनैतिक संबंधाचा संशय, पत्नीला मित्रामार्फत जमीन दाखवण्यासाठी बोलावलं, अन् भयंकर कांड
Crime News : पोलिसांच्या माहितीनुसार, मालादेवीच्या नावावर असलेल्या जमिनीच्या व्यवहारातून सुमारे 26 लाख रुपये मिळाले होते. हे पैसे पत्नी आपल्याला देणार नाही, अशी शंका सुबोध शर्माला होती. यासोबतच पत्नीचे अनेक लोकांशी अनैतिक संबंध असल्याचा संशयही त्याला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अनेक पुरुषांसोबत अनैतिक संबंधाचा संशय
पत्नीला मित्रामार्फत जमीन दाखवण्यासाठी बोलावलं, अन् भयंकर कांड
Crime News : पटना येथील जानीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाजाचक महम्मदपूर परिसरात घडलेल्या मालादेवी हत्याकांडाचा उलगडा अवघ्या 24 तासांत करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मृत महिलेचा पती सुबोध शर्मा याच्यासह दोघांना अटक केली असून, पत्नीच्या हत्येचा कट स्वतः पतीनेच रचल्याचे तपासात उघड झाले आहे. आर्थिक व्यवहार आणि अनैतिक संबंधाच्या संशयाच्या गर्तेतून हे निर्घृण कृत्य घडल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मालादेवीच्या नावावर असलेल्या जमिनीच्या व्यवहारातून सुमारे 26 लाख रुपये मिळाले होते. हे पैसे पत्नी आपल्याला देणार नाही, अशी शंका सुबोध शर्माला होती. यासोबतच पत्नीचे अनेक लोकांशी अनैतिक संबंध असल्याचा संशयही त्याला होता. या सर्व कारणांमुळे सुबोधने पत्नीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. सुबोध शर्मा हा हॉटेल चालक असून, त्याने आपल्या जुन्या ओळखीतील मित्र कुणाल किशोर याच्यासोबत मिळून हत्या करण्याचा कट रचला.
11 जानेवारी रोजी मालादेवीचा मृतदेह जानीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला होता. याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयाची सुई कुणाल किशोर याच्याकडे वळली. जहानाबाद रेल्वे स्थानकावरून त्याला अटक करण्यात आली. तो नारायणपूर मुरारी, पाली (जहानाबाद) येथील रहिवासी आहे.
हेही वाचा : 'शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास...', अखेर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; मार्कर पेनबाबतही भाष्य










