वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला तगडा झटका बसणार, एक्झिट पोलचा अंदाज
DV Research VVCMC Exit Poll 2026 : डीव्ही रिसर्चने जारी केलेल्या या एक्झिट पोलचे उद्दिष्ट मतदारांचा एकूण कल काय आहे? हे जाणून घेणे आहे. या सर्वेक्षणात ग्राउंड-लेव्हल जनमताचा आढावा घेण्यात आलाय. वसई-विरार महापालिकेत 29 वॉर्डांमधून एकूण 115 नगरसेवक निवडले जातात. त्यामुळे या सर्व्हेमध्ये समावून घेतलेल्या लोकांची संख्या देखील मोठी आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला तगडा झटका बसणार,
एक्झिट पोलचा अंदाज
DV Research VVCMC Exit Poll 2026, वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका (व्हीव्हीसीएमसी) निवडणुकीत बहुजन विकास आघाडी (बीव्हीए) 85 ते 95 जागांसह प्रचंड बहुमत मिळवणार असल्याचा अंदाज डीव्ही रिसर्चच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे. या एक्झिट पोलनुसार, बीव्हीएला 54 टक्के मतदान मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्ष (भाजप) 20 ते 30 जागांसह 41 टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची अपेक्षा आहे. इतर पक्ष किंवा अपक्षांना केवळ 0 ते 02 जागा आणि 5 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. हे एक्झिट पोल 6 जानेवारी ते 13 जानेवारी 2026 या कालावधीत घेण्यात आले असून, निकाल उद्या किंवा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या अंदाजामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
डीव्ही रिसर्चने जारी केलेल्या या एक्झिट पोलचे उद्दिष्ट मतदारांचा एकूण कल काय आहे? हे जाणून घेणे आहे. या सर्वेक्षणात ग्राउंड-लेव्हल जनमताचा आढावा घेण्यात आलाय. वसई-विरार महापालिकेत 29 वॉर्डांमधून एकूण 115 नगरसेवक निवडले जातात. त्यामुळे या सर्व्हेमध्ये समावून घेतलेल्या लोकांची संख्या देखील मोठी आहे.
एक्झिट पोलची मुख्य वैशिष्ट्ये
डीव्ही रिसर्चने या एक्झिट पोलसाठी विस्तृतपणे आढावा घेतलाय. यात एकूण 9,500 लोकांचा कल विचारात घेण्यात आलाय, जे सर्व मतदान केलेल्या मतदार आहेत. हे सर्वेक्षण एक्झिट पोलसाठी असून, मुलाखतींवर आधारित आहे. फील्डवर्क 6 जानेवारी ते 13 जानेवारी 2026 या कालावधीत प्रत्येक निवडणूक टप्प्यानुसार घेण्यात आले. सर्व्हेचे स्वरूप: हे स्ट्रॅटिफाइड रँडम सँपलिंग पद्धतीने घेण्यात आले. वॉर्डांची निवड वसई-विरारच्या भौगोलिक क्षेत्र, शहरी निवासी क्लस्टर्स तसेच पूर्वीच्या महापालिका मतदान ट्रेंड्सवर आधारित आहे. प्रत्येक वॉर्डात रँडमली निवडलेल्या मतदान केंद्रांवर 10-15 मतदारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती मतदानानंतर लगेच घेण्यात आल्या. सँपलमध्ये बहुसंख्य शहरी मतदारांचा समावेश आहे.










