देवदर्शनासाठी निघालेल्या भक्तांचा भीषण अपघात, नळदुर्गकडे जाताना क्रूझरचं टायर फुटल्याने 5 जणांचा मृत्यू
Dharashiv accident : मोठी बातमी : नळदुर्गकडे निघालेल्या भक्तांच्या क्रूझरचा टायर फुटल्याने भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नळदुर्गकडे निघालेल्या भक्तांच्या क्रूझरचा टायर फुटल्याने भीषण अपघात
गतिरोधकावर आदळल्याने क्रूझरचा चुराडा, पाच जणांचा मृत्यू
गणेश जाधव, धाराशिव: : सोलापूर–हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन महिलांचा त्यात समावेश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. क्रूझर गाडीचे टायर अचानक फुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अधिकची माहिती अशी की, अपघातातील प्रवासी देवदर्शनासाठी निघाले होते. सर्व प्रवासी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण उळे येथील रहिवासी असल्याचे समजते. आज सकाळच्या सुमारास ही मंडळी नळदुर्गकडे क्रूझरमधून जात असताना हा अनर्थ घडला. महामार्गावर गाडीचा वेग कायम असतानाच पुढील टायर फुटले. त्यामुळे वाहन रस्त्याच्या मध्यभागी अनियंत्रितपणे होऊन पलटी झाले. गाडी उलटताच ती थेट पुढे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला आदळली. या धडकेत गाडीचा अक्षरश: चुराडा झालाय. क्रूझरचा पुढील भाग पूर्णपणे चिरडल्याने आत बसलेले प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. काही प्रवासी वाहनाच्या खाली दाबले गेले. त्यामुळे मृतांची संख्या अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा : मुंबई: डिलीव्हरी बॉय महिलेच्या घरी गेला आणि पाहता क्षणीच प्रेमात पडला, नंतर रिफंडच्या बहाण्याने मॅसेज अन्...
या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात ते आठ जण गंभीर जखमी आहेत. स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी वाहन चालकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित बाहेर काढून सोलापूर येथील सरकारी व खासगी रुग्णालयांकडे उपचारासाठी रवाना करण्यात आले.










