अंजिठा लेणी पाहाण्यासाठी पायऱ्या चढल्यानंतर ह्रदयविकाराचा झटका, पुण्यातील महिलेचा जागेवर मृत्यू

Pune woman dies on the spot after suffering heart attack after climbing stairs to see Anjitha Caves : अंजिठा लेणी पाहाण्यासाठी पायऱ्या चढल्यानंतर ह्रदयविकाराचा झटका, पुण्यातील महिलेचा जागेवर मृत्यू

Pune woman dies on the spot after suffering heart attack after climbing stairs to see Anjitha Caves :

Pune woman dies on the spot after suffering heart attack after climbing stairs to see Anjitha Caves :

मुंबई तक

23 Nov 2025 (अपडेटेड: 23 Nov 2025, 01:39 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अंजिठा लेणी पाहाण्यासाठी पायऱ्या चढल्यानंतर ह्रदयविकाराचा झटका

point

पुण्यातील महिलेचा जागेवर मृत्यू

Pune woman dies on the spot after suffering heart attack after climbing stairs to see Anjitha Caves ,छत्रपती संभाजीनगर : अजिंठा लेणीच्या पर्यटनस्थळी शनिवारी एक दुर्दैवी घटना घडली. पुणे येथील योगिता महेश सावंत (वय 43) यांचा लेणी परिसरातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सावंत कुटुंब पर्यटनासाठी अजिंठा लेणी पाहण्यासाठी आले होते. सकाळी त्यांनी परिसरात भ्रमंती सुरू केली. योगिता सावंत लेणी क्रमांक एककडे जाणाऱ्या पायऱ्या चढत असताना अचानक त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागली.

हे वाचलं का?

घटनास्थळी मदत मिळूनही महिलेचे प्राण वाचले नाहीत

या अचानक बिघडलेल्या प्रकृतीची माहिती मिळताच तैनात असलेले पोलिस कर्मचारी भरत कोळी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी सावंत कुटुंबाला आधार देत प्राथमिक मदत करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती गंभीर दिसत असल्याने लगेच रुग्णवाहीकेची मदत मागवण्यात आली. रुग्णवाहिका चालक अमर जाधव यांनी जगद्‍गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या रुग्णवाहिकेतून योगिता यांना तातडीने अजिंठा रुग्णालयात हलवले.

हेही वाचा : मुंबईकरांनो सावधान! 'मनी लॉन्ड्रिंग' केसमध्ये अडकवण्याची धमकी... पीडित जोडप्याला तब्बल 32.8 लाख रुपयांना गंडा

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच महिलेचा मृत्यू 

मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, योगिता सावंत यांना मृत घोषित करण्यात आले. अचानक झालेल्या या घटनेमुळे सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून लेणी परिसरातही शोककळा पसरली आहे. अजिंठा लेणीसारख्या उंचसखल भूभागात पायऱ्या चढताना प्रकृतीची काळजी घेण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित करणारी ही घटना ठरली. तात्काळ मदत मिळूनही योगिता सावंत यांचे प्राण वाचवता आले नाही, याचे हळहळ व्यक्त केली जात आहे.

गिरनारच्या पायऱ्या चढल्यानंतर तरुणाचा झाला होता मृत्यू

काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील एका तरुण व्यापाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवदर्शनासाठी गिरनार पर्वतावर गेलेल्या प्रसाद उर्फ बाळा रवींद्र संसारे (वय 46, रा. जानवळे, ता. गुहागर) यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. गिरनारच्या सुमारे 600 पायऱ्या चढल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि काही क्षणातच त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: 76 वर्षीय आईला बेन स्ट्रोक, डॉक्टरांकडे नेलं, पण बिलाची रक्कम ऐकून रुग्णालयाकडे फिरकलाच नाही, शेवटी...

    follow whatsapp