Maharashtra Weather : राज्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता निर्माण होईल असं चित्र आहे. अशातच राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. यामुळे आता तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. अशातच राज्यात 13 जानेवारी रोजी हवामान विभागाबाबतची महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूंना तिखट सवाल म्हणाले, 'ठाकरे बंधू आता का एकत्र आले? बाळासाहेब असताना...'
कोकण :
कोकण विभागात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तसेच हलके धुके देखील पडणार आहे. तसेच मुंबईसारख्या शहरात दिवसभर कोरड्या वातावरण अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान हे 18-22 अंश, तर किमान तापमान हे 30-32 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापुरात सकाळी थंडी वाढण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान हे 12 अंश सेल्सिअस राहील, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तसेच काही ठिकाणी तुरळक हलक्या पावसाचा अंदाज आहे. यामुळे थंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा :
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, परभणी आणि धाराशिव भागात थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात, तसेच सकाळी धुके आणि थंड वारे वाहण्याची अधिक शक्यता आहे.
हे ही वाचा : 'फडणवीस म्हणतात अण्णामलाई 'तसं' म्हणालेच नाही ..', राज ठाकरेंकडून लाव रे तो व्हिडिओ.. फडणवीसांवर पडले तुटून!
विदर्भ :
विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच सकाळी दाट धुके आणि थंडीचा वारे वाहतील. काही भागांमध्ये थंडीची लाट निर्माण होऊ शकते.
ADVERTISEMENT











