Maharashtra Weather : राज्यात सध्या ढगाळ वातावरणाचा प्रभाव वाढला असल्याने थंडीमध्ये घट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात ढगाळ हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण टिकून राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, पण यामुळे थंडी टिकून राहण्याची अधिक शक्यता आहे. अशातच 14 जानेवारी रोजी राज्यात तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील याची माहिती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अण्णामलाई याची लुंगी काढणाऱ्याला ठाकरेंच्या 'त्या' नेत्याकडून लाख रुपयांचे बक्षीस...
कोकण :
कोकण विभागात हवामान काही अंशी प्रमाणात ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान हे सुमारे 33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 अंश राहण्याची शक्यता आहे. तसेच रात्री हलका गारवा जाणवेल, तर दिवसभर वातावरणात दमटपणा जाणवेल.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रात पहाटेच्या वेळेत थंडी जाणवेल, तसेच पुणे शगहरात आकाश मुख्यत्वे आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तसेच सायंकाळी अंशत:ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तसेच पुण्यासह सातारा जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.
मराठवाडा :
मराठवाड्यात सकाळी थंड वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच बीड, जालना आणि मराठवाड्यात अशी स्थिती राहणार असल्याची शक्यता आहे. तसेच वातावरण ढगाळ असण्याची शक्यता आहे. यामुळे ढगाळ वातावरणामुळे रात्रीचा गारवा काही प्रमाणात कमी झाला.
हे ही वाचा : अनैतिक संबंध टिकवण्यासाठी महिलेचा खतरनाक प्लान, प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं, अन् शीर बोअरवेलमध्ये टाकलं
विदर्भ :
विदर्भ विभागात काही प्रमाणात थंडीचा प्रभाव असला तरीही किमान तापमानात वाढ झाल्याचं चित्र आहे. नागपूर येथे किमाल 30 अंश सेल्सिअस, तर तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तसेच आकाश निरभ्र राहून सकाळी गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











