अनैतिक संबंध टिकवण्यासाठी महिलेचा खतरनाक प्लान, प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं, अन् शीर बोअरवेलमध्ये टाकलं
Crime news : पती सौरभ त्याची पत्नी प्रीतीसोबत आनंदी जीवन जगत होते. त्यांचा सुखाचा संसार सुरु होता. पण पत्नी प्रीतीचे सूरजसोबत अवैध संबंध सुरु होते. अशातच प्रीतीने पती सौरभचा खून केला होता आणि त्याचे डोके बोअरवेलमध्ये टाकण्यात आले होते. या घटनेनं परिसरात खळबळ उडाल्याचं चित्र आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रियकर सूरजला हाताशी धरत महिलेनं पतीचा केला खून
आरोपीकडून पोलिसांवर गोळीबार
Crime news : उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये पती सौरभ त्याची पत्नी प्रीतीसोबत आनंदी जीवन जगत होते. त्यांचा सुखाचा संसार सुरु होता. पण पत्नी प्रीतीचे सूरजसोबत अवैध संबंध सुरु होते. अशातच प्रीतीने पती सौरभचा खून केला होता आणि त्याचे डोके बोअरवेलमध्ये टाकण्यात आले होते. या घटनेनं परिसरात खळबळ उडाल्याचं चित्र आहे.
हे ही वाचा : प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केली, नंतर गळफास घेऊन संपवलं जीवन, घरातील दृश्य पाहून पोलिसही हादरून गेले
मिळालेल्या माहितीनुसार, 11 जानेवारी रोजी नरखी पोलीस ठाणे परिसर हद्दीतील जखाई गावातील एका ट्यूबवेलजवळ एक मृतदेह आढळून आला होता. तेव्हा त्याचे डोके बोअरवेलमध्ये अडकून बसले होते. फिरोजाबाद पोलिसांनी या हत्येचा उलगडा करत चार पथके तयार करण्यात आली होती.
प्रियकर सूरजला हाताशी धरत महिलेनं पतीचा केला खून
या प्रकरणाच्या तपासादरम्यान, सूरज नावाचा एक तरुण चौकशीच्या कक्षेत आले आहे. सूरज हा सौरभ आणि पत्नी प्रीती यांना ओळखत होता. तो फरार झाला होता आणि घटनास्थळी त्याचा शोध सुरु होता. पोलिसांनी शोध सुरु केला असता, सौरभची पत्नी प्रीती देखील फरार झाली होती. तपासातून समोर आले की, प्रीती आणि सूरज एकमेकांच्या संपर्कात आले होते आणि सलमान नावाचा तरुण देखील त्यांच्याच संपर्कात होता. नंतर असे आढळून आले की, प्रीतीने तिचा प्रियकर सूरजला हाताशी धरत पतीचा खून केला. तिघेही पोलीस कोठडीत असून पोलिसांनी हत्येत वापरलेला चाकू जप्त केला आहे.
हे ही वाचा : खाकी वर्दीची प्रतिमा मलीन करणारा प्रकार, बीडमध्ये पोलीस दलातील कर्मचाऱ्याने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत केलं लैंगिक शोषण
आरोपीकडून पोलिसांवर गोळीबार
या संपूर्ण घटनेबाबत एएसपी सिटी शिवशंकर प्रसाद म्हणाले की, आरोपी पळून जाताना त्यांनी, पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांच्या कारवाईतून सूरज गंभीर जखमी झाला आणि तिघांना अटक करण्यात आली.










