ठाण्यातील 21 वर्षीय एअर होस्टेसने संपवलं आयुष्य; एक्स बॉयफ्रेंडविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे जिल्ह्यातून एका 21 वर्षीय एअर होस्टेसने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. त्यानंतर, पोलिसांनी पीडितेच्या एक्स बॉयफ्रेंडवर तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

21 वर्षीय एअर होस्टेसने संपवलं आयुष्य;

21 वर्षीय एअर होस्टेसने संपवलं आयुष्य;

मुंबई तक

• 06:12 PM • 14 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

ठाण्यातील 21 वर्षीय एअर होस्टेसने संपवलं आयुष्य

point

तरुणीच्या एक्स बॉयफ्रेंडविरुद्ध गुन्हा दाखल

Thane Crime: ठाणे जिल्ह्यातून एका 21 वर्षीय एअर होस्टेसने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. त्यानंतर, पोलिसांनी पीडितेच्या एक्स बॉयफ्रेंडवर तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. संबंधित तरुणीने 28 डिसेंबर 2025 रोजी कल्याण (पूर्ण) येथील तिच्या घरी फाशी घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा मोबाईल फोन आणि आर्थिक रेकॉर्ड तपासल्यानंतर, कोळसेवाडी पोलिसांनी 10 जानेवारी रोजी तिच्या 23 वर्षीय माजी जोडीदाराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, 28 डिसेंबर रोजी रात्री तरुणीला तिच्या आईने फोन केला असता तिला त्याचं उत्तर मिळालं नाही. त्यानंतर, त्यानंतर कल्याणमधील अनुसूया निवास येथील तिच्या घरी जाऊन पाहिल्यानंतर छताच्या हुकला लटकलेला तरुणीचा मृतदेह आढळला. 

प्रेयसीचे प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी 

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, मृत तरुणी आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड 2020 पासून प्रेमसंबंधात होते. आरोपानुसार, तिच्या प्रियकराने तिला तिचे काही प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती आणि लग्न करण्यासाठी नकार दिला होता. इतकेच नव्हे तर, तो नुकतंच एका दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंधात होता आणि त्यामुळेच, तिने स्वत:चं आयुष्य संपवलं. 

हे ही वाचा: ठाकरे गड राखणार की महायुती बाजी मारणार? BMC साठी उद्या मतदान, 'इतके' सुरक्षारक्षक तैनात

अंत्यसंस्कार झाल्यानंतर, कुटुंबियांनी तिचा फोन आणि बँक स्टेटमेंट तपासले, ज्यामध्ये बऱ्याच बाबी उघडकीस आल्या. तिच्या शरीरावर सापडलेल्या चॅट रेकॉर्ड आणि खुणांवरून आरोपीने तिच्यावर वारंवार हल्ला केला असल्याचं दिसून आलं. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या प्रियकराने लग्नाच्या बहाण्याने तिच्याकडून लाखो रुपये घेतले होते आणि 16 डिसेंबर 225 रोजी तिचं शेवटचं ट्रान्सझेक्शन झाल्याचं तरुणीच्या बँक अकाउंटवरून स्पष्ट झालं. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईतील मतदारांनो! आता, मतदानाची वेळ केली कमी... 'हा' नवा बदल जाणून घ्या

तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 108 अंतर्गत त्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे. 

    follow whatsapp