ठाकरे गड राखणार की महायुती बाजी मारणार? BMC साठी उद्या मतदान, 'इतके' सुरक्षारक्षक तैनात

मुंबई तक

BMC 2026 election : 29 महानगरपालिका निवडणुकींचा प्रचार मंगळवारी थंडावला. यामध्ये लक्षवेधी ठरत आहे ती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक. या निवडणुकीत ठाकरे गड राखणार की महायुती बाजी मारणार हे काही तासांमध्ये समजणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ठाकरे गड राखणार की महायुती बाजी मारणार?

point

BMC साठी उद्या मतदान

point

'इतके' सुरक्षारक्षक तैनात

BMC 2026 election : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकींचा प्रचार मंगळवारी थंडावला. यामध्ये लक्षवेधी ठरत आहे ती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक. मुंबई मनपाच्या निवडणुकीसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंमध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळत आहे. मराठी आणि अमराठीच्या मुद्द्यावरुन ही निवडणूक गाजत आहे. तसेच मुंबईचे महापौरपद आणि मुंबईची आंतरराष्ट्रीय ओळख यावरुन बराच वाद रंगलेला पहायला मिळाला. दरम्यान, कडेकोट बंदोबस्तात उद्या (15 जानेवारी) मतदान; तर 16 जानेवारीला निकाल लागणार आहे.   

हे ही वाचा : मुंबईची खबर: मुंबईतील मतदारांनो! आता, मतदानाची वेळ केली कमी... 'हा' नवा बदल जाणून घ्या

अशी असेल सुरक्षाव्यवस्था?

मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी उद्या सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. ही सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी 25 हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये 10 अॅडिशनल कमिश्नर्स, 33 डीसीपी, 84 एसीपी यांच्यासोबत होमगार्ड्स, एसआरपीएफ आणि क्विक रिस्पॉन्स टीम्सचा समावेश आहे.

ठाकरे बंधूंची एकजूटता आणि महायुतीची रणनीती

राज आणि उद्धव ठाकरे हे दशकभराच्या दुराव्यानंतर एकत्र आल्याने ही निवडणूक खास ठरली आहे. दोघांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरुन रान पेटवले आहे; तर 2022 मध्ये शिवसेनेतील फूटीनंतर एकनाथ शिंदे यांचादेखील या निवडणुकीत कस लागणार आहे. फडणवीसांनी हिंदू आणि मराठी महापौरपदाचे आश्वासन देत निवडणुकीला भावनिक वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.

महिलांसाठी आश्वासनांचा पाऊस

मतदारांना आकर्षित करण्यासाठी ठाकरे बंधू आणि महायुतीने आश्वासनांची खैरात केली आहे. महायुतीने बेस्ट बसेसमध्ये महिलांना 50 टक्के सवलत देण्याचे आश्वासन दिले आहे; तर ठाकरे बंधूंनी घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये भत्ता आणि 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांवर मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने प्रदूषण नियंत्रण आणि मुंबईची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणार  असल्याचे आश्वासन दिले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp