Govt Job: भारतीय हवाई दलात मोठी भरती! 'या' पदांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू... काय आहे पात्रता?

इंडिअन एअरफोर्स म्हणजेच भारतीय हवाई दलाकडून 'अग्निवीर वायु INTAKE 01/2027' पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 12 जानेवारी 2026 रोजी सुरू झाली असून उमेदवार 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.

भारतीय हवाई दलात मोठी भरती!

भारतीय हवाई दलात मोठी भरती!

मुंबई तक

• 01:41 PM • 13 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवाई दलात मोठी भरती!

point

'या' पदांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू...

point

काय आहे पात्रता आणि वयोमर्यादा?

Govt Job: भारतीय हवाई दलात सहभागी होऊन देशसेवा करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इंडिअन एअरफोर्स म्हणजेच भारतीय हवाई दलाकडून 'अग्निवीर वायु INTAKE 01/2027' पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 12 जानेवारी 2026 रोजी सुरू झाली असून उमेदवार 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात. 

हे वाचलं का?

भारतीय हवाई दलाच्या या भरतीमध्ये अविवाहित तरुण आणि तरुणी सहभागी होऊ शकतात. संबंधित पदांसाठी भरती करण्यासाठी उमेदवार iafrecruitment.edcil.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. 

शैक्षणिक पात्रता 

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी इंटरमीजिएट/ 10+2 वी किंवा समतुल्य परीक्षेत गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांत किमात 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यासोबतच, इंग्रजी विषयात सुद्धा किमान 50 टक्के गुण असणं गरजेचं आहे. तसेच, मॅकेनिकल/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल/ कंप्यूटर सायन्स/ इंस्ट्रूमेंटेशन टेक्नॉलॉजी/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयांत तीन वर्षांचा इंजीनिअरिंग डिप्लोमा किंवा भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह दोन वर्षांचा व्होकेशनल कोर्स असणं गरजेचं आहे. विज्ञान व्यतिरिक्त इतर स्ट्रीममधून 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण उमेदवार सुद्धा अप्लाय करू शकतात. 

वयोमर्यादा 

अर्जदारांची जन्मतारीख 1 जानेवारी 2006 ते 1 जुलै 2009 दरम्यान असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी सर्व टप्पे क्लिअर केल्यास कमाल वयोमर्यादा 21 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. 

हे ही वाचा: 34 वर्षीय शेजारणीच्या घरात घुसला 18 वर्षीय तरुण, मध्यरात्री भयंकर कांड! पोलीस सुद्धा चक्रावले...

कसा कराल अर्ज? 

1. सर्वप्रथम iafrecruitment.edcil.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
2. त्यानंतर, News सेक्शनमध्ये Online Registration For AGNIVEERVAYU INTAKE 01/2027 commencing at 1100 Hr on 12 January 2026 and will close at 2300 Hr on 01 February 2026 या टॅबसमोर (Click Here) लिंकवर क्लिक करा. 
3. आता, IAF Agniveer Vayu 01/2027 चा लॉगिन डॅशबोर्ड ओपन होईल. 
4. वेबसाइटवर रजिस्टर्ड नसाल तर, 'Register Here' वर जाऊन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा. 
5. नंतर, रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. 
6. अॅप्लिकेशन फॉर्ममध्ये वैयक्तिक आणि शैक्षणिक पात्रतेसह इतर महत्त्वाची माहिती भरा. 
7. शेवटी, फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करा. फॉर्म भरल्यानंतर तो फायनल सबमिट करून त्याची प्रिंटआउट काढून घ्या. 

हे ही वाचा: आंतरजातीय प्रेमविवाह, 8 महिन्यांचा मुलगा... पण शेवटी वडिलांनीच मुलीचा संसार केला उद्धवस्त! नेमकं काय घडलं?

ऑनलाइन अर्ज करतेवेळी उमेदवारांना 550 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल. भरतीसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार भारतीय हवाई दलाची अधिकृत वेबसाइट तपासू शकतात. 

    follow whatsapp