34 वर्षीय शेजारणीच्या घरात घुसला 18 वर्षीय तरुण, मध्यरात्री भयंकर कांड! पोलीस सुद्धा चक्रावले...
34 वर्षीय शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून एका 18 वर्षीय तरुणाने भयंकर कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
34 वर्षीय शेजारणीच्या घरात घुसला 18 वर्षीय तरुण
मध्यरात्री घडली भयानक घटना
Crime News: बंगळुरूच्या सुब्रमण्य लेआउट परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 3 जानेवारी 2026 च्या रात्री येथील एका अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाने अखेर आग आटोक्यात आणली. मात्र, यात एका सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून कार्यरत असलेल्या 34 वर्षीय शर्मिला कुशलप्पा नावाच्या महिलेचा मृतदेह सापडला. सुरुवातीच्या तपासात पोलिसांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय आला. पण जेव्हा मृतदेह पोस्टमॉर्टम तपासणीसाठी पाठवण्यात आला तेव्हा फॉरेन्सिक रिपोर्ट्सवरून धक्कादायक बाब समोर आली.
पोस्टमॉर्टम रिपोर्ट्समध्ये दिसून आलं की शर्मिलाच्या फुफ्फुसांमध्ये अपेक्षित कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण नव्हते. याचा अर्थ असा की फ्लॅटमध्ये आग लागली तेव्हा शर्मिला जिवंत नव्हती. तसेच, तिच्या मानेवर आढळलेल्या खुणांच्या आधारे तिला गळा दाबून मारण्यात आल्याचं स्पष्ट झाले. हत्येनंतर, सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी आणि आग लावण्यात आली. बंगळुरू पोलिसांनी ताबडतोब या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि जवळचे सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाईल टॉवरच्या ठिकाणांची तपासणी सुरू केली.
हे ही वाचा: आंतरजातीय प्रेमविवाह, 8 महिन्यांचा मुलगा... पण शेवटी वडिलांनीच मुलीचा संसार केला उद्धवस्त! नेमकं काय घडलं?
रागाच्या भरात महिलेचा गळा दाबून हत्या...
संबंधित प्रकरणाच्या तपासादरम्यान, पोलिसांना शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या 18 वर्षीय तरुणावर संशय आला. चौकशीदरम्यान तो वारंवार त्याचे जबाब बदलत होता. शेवटी, पोलिसांनी त्याची कठोर चौकशी केली आणि तांत्रिक पुरावे सादर केले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने 3 जानेवारीच्या रात्री शर्मिलाच्या फ्लॅटमध्ये तो जबदस्तीने घुसल्याचं सांगितलं. इतकेच नव्हे तर, त्या तरुणाने महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, पीडितेने त्याला स्पष्टपणे विरोध केला. त्यावेळी, शर्मिला ओरडण्याचा आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती आणि तेव्हा आरोपीने रागाच्या भरात तिचा गळा दाबून खून केला. नंतर अटकेच्या भीतीने, त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी ज्वलनशील पदार्थांचा वापर करून अपार्टमेंटला आग लावली. दरम्यान, कोणतेही डिजिटल रेकॉर्ड मागे राहू नयेत याची खात्री करण्यासाठी त्याने शर्मिलाचा मोबाईल फोन देखील चोरला.
हे ही वाचा: सरपंचाच्या मुलाचे दुसऱ्या जातीतील मुलीशी प्रेमसंबंध, आईने विरोध करताच इंग्लंडमध्ये रचला खुनाचा कट; घरी पोहोचताच काटा काढला
आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेत आणखी कोणी सहभागी आहे का? किंवा आरोपीने यापूर्वी अशाच प्रकारच्या घटना घडवण्याचा प्रयत्न केला आहे का? याचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.










