सरपंचाच्या मुलाचे दुसऱ्या जातीतील मुलीशी प्रेमसंबंध, आईने विरोध करताच इंग्लंडमध्ये रचला खुनाचा कट; घरी पोहोचताच काटा काढला
प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे मुलानेच आपल्या आईची निर्घृण हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आरोपी तरुण हा शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये राहायला होता. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सरपंचाच्या मुलाचे दुसऱ्या जातीतील मुलीशी प्रेमसंबंध
आईने विरोध करताच इंग्लंडमध्ये रचला खुनाचा कट
नंतर, गावी पोहचून आईचा काढला काटा
Crime News: हरियाणाच्या यमुनानगर येथून एका भयानक हत्याकांडाचं प्रकरण समोर आलं आहे. मुलानेच आपल्या आईची निर्घृण हत्या केल्याची माहिती आहे. आरोपी तरुण हा शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये राहायला होता. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
आई आणि मुलाच्या नात्यात तणाव
24 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास यमुनानगरच्या श्यामपूर गावातील सरपंचाची पत्नी तिच्या घरात मृतावस्थेत आढळली. संबंधित महिलेचं नाव बलजिंदर कौर असून तपासादरम्यान, तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचं समोर आलं. गावातील सरपंचाच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आला. पोलिसांनी तपास सुरू करताच, बलजिंदर कौरचा मुलगा गोमित राठी याचं नाव समोर आलं. गोमित हा शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये राहत असून तिथल्याच एका स्टोरमध्ये नोकरी करत असल्याचं गावकऱ्यांना माहीत होतं. मात्र, आई आणि मुलाचे संबंध तणावाचे असल्याने पोलिसांना वेगळाच संशय आला.
दुसऱ्या जातीतील तरुणीसोबत प्रेमसंबंध अन्...
खरं तर, गोमितचं वागणं त्याच्या कुटुंबियांसाठी चिंताजनक होतं. या प्रकरणाचा तपास केला असता, गोमितचे दुसऱ्या जातीतील तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याकारणाने त्यांच्या कुटुंबात सतत वाद होत असल्याचं समोर आलं. बलजिंदर कौर तिच्या मुलाच्या प्रेमसंबंधाला विरोध करत होती कारण, एक आई म्हणून तिला तिच्या मुलाला योग्य मार्गावर आणायचं होतं. घरातील नेहमीच्या वादाला कंटाळून, आई-वडिलांनी गोमितला इंग्लंडमध्ये पाठवले. घरापासून दूर राहिला तो सुधारेल, हेच त्यामागचं कारण होतं. परंतु, गोमितच्या मनात तर सुडाची आग पेटत होती आणि यातूनच त्याने मोठा कट रचला.
हे ही वाचा: 'सावळी आहेस, डॉक्टर कशी बनणार?..', सततच्या छळामुळे नैराश्यात, विद्यार्थीनीची आत्महत्या, कुटुंबियांचे गंभीर आरोप
गावातील गोठ्यात लपून बसला अन् आईची हत्या....
गोमित राठी 18 डिसेंबर रोजी कोणालाच न सांगता इंग्लंडहून भारतात परतला होता. त्याचा जवळचा मित्र पंकजने त्याला त्याच्या या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतलं. गोमित 18 डिसेंबर ते 24 डिसेंबर पर्यंत गावातील एका गोठ्यात लपून बसला. हजारो मैल दूर प्रवास करून घरी परतण्याऐवजी, सहा दिवस तो गोठ्यातील घाणीत आणि प्राण्यांमध्ये लपून बसला. दरम्यान, पंकजने गोमितचं जेवण आणि इतर गोष्टींची सोय करून ठेवली होती. 24 डिसेंबरच्या रात्री, संधी मिळताच गोमित गोठ्यातून बाहेर पडला आणि त्याने त्याच्या घरात प्रवेश केला. त्याची आई, बलजिंदर कौर, तिथे एकटी होती. त्यावेळी, गोमितने त्याच्या आईवर हल्ला केला आणि स्वतःच्या हातांनी तिचा गळा दाबून खून केला.










