लग्नाला वर्ष होण्याआधीच नवऱ्याचे अनैतिक संबंध, गौरीला समजताच पंकजा मुंडेंच्या पीएकडून टॉर्चर, नातेवाईकांचे आरोप

Pankaja Munde PA Anant Garje wife commits Suicide case : लग्नाला वर्ष होण्याआधीच नवऱ्याचे अनैतिक संबंध, गौरीला माहिती होताच अनंत गर्जेंकडून टॉर्चर, नातेवाईकांचे गंभीर आरोप

Pankaja Munde

Pankaja Munde

मुंबई तक

23 Nov 2025 (अपडेटेड: 23 Nov 2025, 11:44 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लग्नाला वर्ष होण्याआधीच नवऱ्याचे अनैतिक संबंध

point

गौरीला माहिती होताच अनंत गर्जेंकडून टॉर्चर

point

नातेवाईकांचे गंभीर आरोप

Pankaja Munde PA Anant Garje wife commits Suicide case : भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने मुंबईतील निवासस्थानी शनिवारी (22 नोव्हेंबर) आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. गौरी पालवे यांनी गळफास घेऊन आयुष्य संपविल्याची घटना उघड झाली असून, अनंत गर्जे आणि डॉ. गौरी यांचा विवाह यंदाच्या 7 फेब्रुवारीला झाला होता. लग्नानंतर अवघ्या दहा महिन्यांत त्यांनी वरळीतील घरात हे टोकाचं पाऊल उचलल्याचे समजते. शनिवार सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास त्यांनी गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. कौटुंबिक कलहातून ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे वाचलं का?

वरळी पोलिसांनी या प्रकरणाची अपमृत्यू म्हणून नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात हलवला आहे. गौरी या वरळी बीडीडी चाळीत राहत होत्या. गेल्या काही दिवसांपासून घरगुती वाद वाढले होते. पती अनंत गर्जे यांचा बाहेरील महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय गौरी यांना होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे आणि त्या मानसिक तणावात असल्याचे समोर आले आहे.

गौरी पालवे यांच्या मामाची प्रतिक्रिया

डॉ. गौरी पालवे यांच्या मामांनी सांगितले की, शनिवारी दुपारपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. अनंत गर्जे यांचे बाहेर संबंध असल्याचे गौरीला माहिती होते. तिने त्याचे चॅट्सदेखील पाहिले होते आणि ते तिने तिच्या वडिलांनाही दाखवले होते. अनंत म्हणतोय, ‘तिने माझ्यासमोर आत्महत्या केली’, पण आम्हाला त्यावर विश्वास नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. गौरीचे वडीलही कालपासून पोलिस ठाण्यात बसून आहेत. सामान्य माणसांना न्याय मिळत नाही, असेही त्यांनी म्हटले. गौरीच्या वडिलांकडे चॅटचे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

अनंत गर्जे आणि डॉ. गौरी पालवे यांच्या लग्नाला पंकजा मुंडेंसह त्यांची बहीण प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. मोठ्या थाटामाटात 7 फेब्रुवारीला विवाह झाला होता. मात्र, अवघ्या दहा महिन्यात या दुःखद घटनेने प्रश्न निर्माण केले आहेत. अनंत गर्जे यांचे अनैतिक संबंध असल्याने गौरी अस्वस्थ होत्या, अशी माहिती असून, त्याचवेळी सासरच्या मंडळींकडून त्यांना त्रास दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. वरळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, मृतदेह ताब्यात घेऊन केईएमला पाठवला आणि पुढील तपास सुरू आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीची आत्महत्या, दु:खद घटनेनंतर पंकजा ताईंचा बीड दौरा रद्द

    follow whatsapp