Maharashtra Weather : राज्यात उद्या 22 नोव्हेंबर रोजी थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण असून, मुंबईसह कोकण विभागात उष्ण आणि दमट हवेची लक्षणे दिसून येतील. पुणे आणि मराठवाडा भागातील हवामान काही प्रमाणात थंड आणि कोरडे अपेक्षित आहे. अशातच 22 नोव्हेंबर रोजी राज्यातील हवामानाचा एकूण अंदाज जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जालन्यात 13 वर्षीय शाळकरी मुलीने उचललं टोकाचं पाऊल, शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य
कोकण विभाग :
कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदु्र्ग, मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्याचा समावेश होतो. या जिल्ह्यांमध्ये काही अंशी प्रमाणात वातावणात बदल जाणवू शकतो. या विभागातील रायगड, पालघर आणि सिंधुदुर्गातील वातावरण कोरडं असण्याची शक्यता आहे. तसेच दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील हवामानात बदल दिसणार आहे. यापैकी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर या दोन जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांतील वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या एकूण जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरड्या वातावरणाचा इशारा दिला आहे. तसेच तापमानात फारसा फरशी तफावता जाणवणार नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : चंद्रपूर हादरलं! हॉस्टेलमध्ये मानसिक त्रास, अखेर 17 वर्षाच्या तरुणाने दोर आवळत संपवलं जीवन, 'त्या' चौघांचं नाव समोर
विदर्भ विभाग :
मराठवाडा विभागातील अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कसलाही अंदाज जारी केलेला नाही. अशातच आता राज्यात थंडीची तीव्रता कायम राहील आणि किमान तापमानात घट होऊन काही प्रमाणात पावसाचा इशारा आहे.
ADVERTISEMENT











