IB Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. इंटेलिजन्स ब्युरो (IB) कडून मल्टी टास्किंग स्टाफच्या एकूण 362 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 22 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 14 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा आणि पात्रता
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी 10 उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. 10 वी उत्तीर्ण असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. शिवाय, गुप्तचर विभागाच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, 18 वर्षे ते 25 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आहेत.
हे ही वाचा: लग्न कर म्हणून मागे लागल्याने मामा संतापला, भाचीला थेट धावत्या ट्रेनमधून ढकललं, वसईतील धक्कादायक घटना
अर्जाचं शुल्क
या भरतीसाठी उमेदवारांना अर्जाचं शुल्क सुद्धा भरावं लागणार आहे. जनरल (Open), ओबीसी (OBC)आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 650 रुपये आणि एससी (SC), एसटी (ST), पीडब्ल्यूएस (PWS)प्रवर्गातील तसेच महिला, माजी सर्व्हिसमनला 550 रुपये शुल्क भरावं लागणार आहे.
हे ही वाचा: पोटच्या मुलीवर तीन वेळा बलात्कार... नराधम बापाला न्यायालयाकडून 178 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
कसा कराल अर्ज?
1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम mha.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. त्यानंतर, भरतीच्या सेक्शनमध्ये जाऊन IB MTS Recruitment 2025 नोटिफिकेशनवर क्लिक करा.
3. आता आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करा आणि एक लॉगिन आयडी तसेच पासवर्ड तयार करा.
4. नंतर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर महत्त्वाची माहिती भरून अर्ज पूर्ण करा.
5. शेवटी, अर्जाचं शुल्क भरा आणि प्रिंटआउट काढून भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.
ADVERTISEMENT











