Maharashtra Weather : महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात सामान्यतः हवामान कोरडे आणि थंड असते, पण यंदा उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे किमान तापमान सामान्यपेक्षा खाली राहिले आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि इतर स्रोतांच्या अंदाजानुसार, 14 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्र आणि मध्य भारतातील बहुतांश भागांत किमान तापमान कमी राहण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अर्ज घातलं, भाजपच्या महिला उमेदवाराचं मराठी बोलण्यावरुन तुफान ट्रोलिंग, आता नितेश राणे म्हणाले..
कोकण विभाग :
कोकण विभागात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा इशारा दिला आहे. तापमानात घट होईल आणि थंडावा जाणवेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र विभाग :
या विभागात धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या एकूण जिल्ह्यांत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तापमानात काही प्रमाणात घड झाल्याने वातावरणात गारवा निर्माण होईल, असं हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. तसेच अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत हवामान विभागाने वातावरणाचा कसलाही अंदाज जारी केला नाही.
हे ही वाचा : 'एखाद्या माणसाचा पक्ष बळकावून घेताय..', राज ठाकरेंच्या पत्नी कोणावर भडकल्या?
विदर्भ विभाग :
विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोली या एकूण जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वातावरणाचा कसलाही अलर्ट जारी केलेला नाही.
ADVERTISEMENT











